agriculture news in Marathi, Fuel rate hike | Agrowon

इंधन दरवाढ शेतकऱ्यांच्या मुळावर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

औरंगाबाद : इंधन दरवाढीचा थेट आघात आता शेतीवरही जाणवू लागला आहे. एकीकडे पावसाच्या खंडाने उत्पादनात मोठी घट झाली आहे. दुसरीकडे इंधन दरवाढीने पिकांची मळणी, शेतीची मशागत व सिंचनाच्या कामात इंधनाच्या वापरावरील खर्चात झालेल्या दीडपट ते दुप्पट वाढीनं कंबरड मोडलं. एकप्रकारे इंधनाची दरवाढ घामाला परवडणारा दाम मिळण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था अधिकच गलीतगात्र करीत असल्याची भावना शेतकरीच व्यक्‍त करत आहेत. 

औरंगाबाद : इंधन दरवाढीचा थेट आघात आता शेतीवरही जाणवू लागला आहे. एकीकडे पावसाच्या खंडाने उत्पादनात मोठी घट झाली आहे. दुसरीकडे इंधन दरवाढीने पिकांची मळणी, शेतीची मशागत व सिंचनाच्या कामात इंधनाच्या वापरावरील खर्चात झालेल्या दीडपट ते दुप्पट वाढीनं कंबरड मोडलं. एकप्रकारे इंधनाची दरवाढ घामाला परवडणारा दाम मिळण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था अधिकच गलीतगात्र करीत असल्याची भावना शेतकरीच व्यक्‍त करत आहेत. 

पावसाच्या दोन ते तीन वेळा पडलेल्या मोठ्या खंडांनी मराठवाड्यातील खरिपाच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. निसर्ग आपल्या हातचा नाही म्हणून, जे मिळालं ते नशीब मानून पिकाची मळणी, रब्बीच्या तयारीसाठी मशागती किंवा विजेच्या अनुपलब्धतेमुळे डिझेलवरील इंजिनाच्या साह्याने पिकाला पाणी देऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांच्या खर्चात इंधनाच्या खासकरून डिझेलच्या दरवाढीनं दीडपट वाढ झाली आहे. विजेच्या खंडात सिंचनासाठी डिझेल इंजिन वापरल्यास दिवसाला ६ ते ७ लिटर लागतं. आधी एक लिटर डिझेल आधी ५६ ते ६० रुपयांना मिळायचं ते आता ७५ च्या पुढं गेलयं. त्यामुळे जवळपास १५ ते १७ रुपये लिटरमागे  सिंचनाचा खर्च वाढला. कोणत्याही खेड्यातून जवळच्या बाजारात २० रुपये गोणीने वा कॅरेटने नेल्या जाणाऱ्या शेतीमालासाठी आता ३० रुपये मोजावे लागताहेत. 

रब्बीत खरिपाची कसर भरून काढावी म्हणून शेतीची मोघडणी वा वखरणी करून जमीन तयार करणाऱ्यांना आधी किमान ४०० रुपये प्रतिएकर खर्च यायचा. तो यंदा ६०० रुपये प्रतिएकर सांगितला जातोय. गतवर्षी रब्बीची पेरणी एक हजार रुपये प्रतिएकर होती. ती यंदा सुरू झाली नसली तरी विचारपूस करता किमान १२०० रुपये एकरप्रमाणे राहिलं असं सांगितलं जात असल्याचं शेतकरी सांगतात. काही ठिकाणी मूग, उडिद मळणी यंत्रातून काढण्यासाठी क्‍विंटलला ३ ते ५ किलो उडीद, मूग घेण्याचा रिवाज होता. तो यंदा ६ ते ७ किलोवर पोचल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलं. 

आधीच पावसानं दडी मारून मोठं नुकसान केलं. आता इंधनाची दरवाढ आमच्या उत्पादन खर्च व शेतीकामाच्या खर्चात वाढ करत आहे. 
- संतोष बिल्लारे, बेलवाडी,  जि. जालना. 

इंधनाच्या दरवाढीनं मळणीयंत्र, मशागतीच्या दरात दीडपट वाढ केलीय. आधीचं उत्पादन नाही, त्यात वाढलेला खर्च आमचं कंबरडं मोडतोय. मायबाप सरकार याचा काही इचार करंल का नाई.
- धनंजय सोळंके, नागापूर, जि. बीड.

इतर ताज्या घडामोडी
तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल...बुलडाणा : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार अवकाळी व...
काढणीपश्चात नुकसान टाळण्यासाठी...फळे आणि भाजीपाल्याची टिकवण क्षमता वाढविण्यासाठी...
भात, नागली पिकांचे ११ हजार हेक्टरवर...रत्नागिरी ः क्यार वादळाच्या प्रभावामुळे झालेल्या...
वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षणाचे...अकोला ः केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान कौशल्य...
नागपूर : रिक्‍त पदांमुळे वाढली कृषी...नागपूर ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे झालेल्या...
नाशिक : रब्बी हंगामाच्या क्षेत्रात ३०...येसगाव, जि. नाशिक ः दमदार पावसामुळे गाव व परिसरात...
बियाणे कंपन्यांचे हित जपण्यासाठीच...यवतमाळ ः केंद्र सरकार बियाणे अधिनियमात सुधारणा...
सातारा : पंचनाम्याचा फेरा नको; सरसकट...सातारा  ः जिल्ह्यात पावसाने अक्षरश: थैमान...
तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तारण...नांदेड  ः  २०१८-१९ या वर्षात शेतीमाल...
भाजप सत्ता स्थापन करणार नाही :...मुंबई  : आम्हाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण...
श्रीगोंदे तालुक्यात पिके गेली; पण...श्रीगोंदे, जि. नगर  : श्रीगोंदा तालुक्यात...
परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ६१४ क्विंटल...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात किंमत...
`ऊस उत्पादकांवरील अन्याय सहन करणार नाही`कोल्हापूर  ः पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान...
गुलटेकडीत फ्लॉवर, वांगी, गाजराच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
वनस्पतींच्या संरक्षणामध्ये कार्यरत...वनस्पतीच्या मुळांमध्ये राहत असलेल्या...
‘एसआरटी’द्वारे कमी पाण्यात अधिक उत्पादन...औरंगाबाद : ‘‘ एसआरटी तंत्रज्ञानाद्वारे जमिनीची...
सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील...सांगली : जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पाऊस दमदार झाला....
‘स्वाभिमानी’च्या आंदोलनामुळे विम्याचे...सोलापूर : मंगळवेढा तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे...
सिंचन विहिरींसाठी त्रास झाल्यास करा...यवतमाळ  ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी...
अकोला जिल्ह्यात ३.८४ लाख हेक्टरला...अकोला  ः गेल्या महिन्यात झालेल्या सततचा पाऊस...