हळद शिजविण्यासाठी कुकरचा वापराने इंधन, पाणी, श्रम, वेळेची बचत

हळद शिजविण्यासाठी कुकरचा वापराने इंधन, पाणी, श्रम, वेळेची बचत
हळद शिजविण्यासाठी कुकरचा वापराने इंधन, पाणी, श्रम, वेळेची बचत

हिंगोली ः हळद शिजविण्यासाठी कुकरचा वापर वाढला आहे. त्यामुळे मजूर, इंधन यावरील खर्च कमी झाला आहे. वेळ आणि पाणीदेखील कमी लागत आहे. सुरक्षितरित्या हळद शिजवता येत आहे. हळदीची प्रत चांगली रहात आहे. त्यामुळे चांगला बाजारभाव मिळत आहे.

हिंगोली जिल्ह्यापाठोपाठ शेजारील नांदेड, परभणी या जिल्ह्यामध्ये कमी पाण्यावर किफायतशीर उत्पादन देणाऱ्या हळद पिकांच्या क्षेत्रात दरवर्षी वाढ होत. गादी वाफा या सुधारित लागवड तंत्रज्ञानामुळे एकरी हळद उत्पादनात वाढ झाली आहे. हळदीमध्ये लागवडीपासून काढणीपर्यंत तसेच त्यापुढील पॅालिसिंग प्रक्रियेत यांत्रिकरण झाले आहे. गेल्या ८ ते ९ वर्षांपासून हळद शिजविण्यासाठी शेतकरी कुकरचा वापर करत आहेत. 

पारंपरिक पद्धतीत शेतकरी हळद शिजविण्यासाठी कढईचा वापर करत असत. त्यासाठी चुलांगण खोदावे लागे. चुलांगणावर हळद शिजविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाकूड फाटा लागत असे. जाळ कमी जास्त झाल्यास कढईच्या आधणातील बुडाची हळद करपत असे. चुलांगणवरून कढई लवंडल्यास तसेच कढईमध्ये पडून अपघात होत असत. या पद्धतीने शिजविलेली हळद वाळण्यासाठी वेळ लागत असे. परंतु, गेल्या ८ ते ९ वर्षांपासून हळद शिजविण्यासाठी कुकरचा वापर केला जात आहे. कुकरमुळे मजुरांची संख्या तीन ते चार पर्यंत कमी झाली आहे. इंधन आणि पाणीदेखील कमी लागत आहे. शिजविलेली हळद लवकर वाळत असून प्रतदेखील चांगली राहत आहे. त्यामुळे चांगले दर मिळत आहेत. 

हिंगोली जिल्ह्यात हळदीचे क्षेत्र ३५ हजार हेक्टरपर्यंत वाढले आहे. कुकरची मागणी वाढल्यामुळे वसमत परिसरात कुकर निर्मितीचे उद्योग सुरू झाले आहेत. कुकरव्दारे हळद शिजविणे पारंपरिक पद्धतीपेक्षा थोडे खर्चिक असले तरी हळदीची प्रत चांगली रहाते. त्यामुळे बाजारात चांगले दर मिळतात. त्यामुळे शेतकरी हळद शिजविण्यासाठी कुकरचा वापर करत आहेत. 

कढईमध्ये हळद शिजविण्यासाठी खूप वेळ तसेच सात ते आठ मजूर लागतात. अपघाताचा धोका होता. कुकरमुळे सुरक्षितपणे हळद शिजविता येते. वेळ, इंधन, पाण्याची बचत होते.  - प्रल्हाद बोरगड, हळद उत्पादक शेतकरी, सातेफळ, जि. हिंगोली. 

आमच्या भागात हळद शिजविण्यासाठी कुकरचा वापर वाढला आहे. गावोगाव कुकर उपलब्ध होत आहेत. त्यामुळे कढईव्दारे हळद शिजविण्याची पारंपरिक पद्धत बंद झाली आहे.  - बाळासाहेब राऊत, हळद उत्पादक शेतकरी, तेलगांव, जि. हिंगोली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com