नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
कडधान्ये
हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी फुले विक्रम
महात्मा फुले कृषि विदयापिठाने कंबाईन हार्वेस्टरने काढणी करता येईल अशी हरभऱ्याची ‘फुले विक्रम' ही जात विकसित केली आहे. या जातीची उंची ५५ ते ६० सेंमी असून घाटे जमिनीपासून एक फुटावर लागतात.
महात्मा फुले कृषि विदयापिठाने कंबाईन हार्वेस्टरने काढणी करता येईल अशी हरभऱ्याची ‘फुले विक्रम' ही जात विकसित केली आहे. या जातीची उंची ५५ ते ६० सेंमी असून घाटे जमिनीपासून एक फुटावर लागतात.
महात्मा फुले कृषि विदयापिठाने कंबाईन हार्वेस्टरने काढणी करता येईल अशी हरभऱ्याची ‘फुले विक्रम' ही जात विकसित केली आहे. या जातीची उंची ५५ ते ६० सेंमी असून घाटे जमिनीपासून एक फुटावर लागतात. यामुळे कंबाईन हार्वेस्टरने कटर पीक काढणी करताना कुठल्याही स्वरूपाचे नुकसान होत नाही. ही जात उंच जिरायती, बागायत आणि उशिरा पेरणीस योग्य व सर्वाधिक उत्पादन देणारी आहे. दाण्यांचा आकार मध्यम असून मर रोग प्रतिकारक्षम आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश,राजस्थान आणि उत्तर प्रदेश राज्यात या लागवडीची शिफारस करण्यात आली आहे. या जातीचे जिरायतीमध्ये प्रति हेक्टरी १६.३७ क्विंटल, बागायतीमध्ये २२.२५ क्विंटल आणि उशिरा पेरणीमध्ये २१.१२ क्विंटल उत्पादन मिळते.
जमिनीची निवड
- मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, कसदार, भुसभुशीत जमीन निवडावी. हलकी, चोपण किंवा पाणथळ, क्षारयुक्त जमीन टाळावी.
- खरीप पीक निघाल्याबरोबर खोल नांगरट करून कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. जमिनीत पुरेसे शेणखत मिसळावे.
- प्रति किलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम रायझोबियम जीवाणूसंवर्धकाची प्रक्रिया करावी.
- जिरायती भागात २० सष्टेंबर ते १० ऑक्टोबर, बागायती भागात २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर आणि उशिरा पेरणी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात करावी. हेक्टरी ६५ ते ७० किलो बियाणे लागते. पेरणी ३० x १० सेंमी अंतरावर करावी.
- प्रति हेक्टरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ३० किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावे.
- पिकास प्रमाणशीर पाणी द्यावे. त्यासाठी सरी वरंबा लागवड पध्दत किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा. जास्त पाण्यामुळे पीक उभाळणार नाही याची दक्षता घ्यावी.
संपर्क डॉ. नंदकुमार कुटे, ७५८८५१३३९८
(कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी)
- 1 of 3
- ››