agriculture news in marathi Fulfill the promise given to the flood victims: MLA KalyanShetty | Agrowon

पूरग्रस्तांना भेटून दिलेले आश्वासन पूर्ण करा : आमदार कल्याणशेट्टी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 जानेवारी 2021

अक्कलकोट तालुक्यातील पूरग्रस्तांना भेट देऊन दिलेल्या मदतीचे आश्वासन अद्याप पूर्ण झाले नाही.

सोलापूर ः अक्कलकोट तालुक्यात तीन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमीन, उभी पिके व पशुधन याचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यावेळी अक्कलकोट तालुक्यातील पूरग्रस्तांना भेट देऊन दिलेल्या मदतीचे आश्वासन अद्याप पूर्ण झाले नाही. त्यांना तातडीने मदत देऊन दिलासा द्यावा, असे पत्र अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. 

तालुक्यातील बळिराजाची अवस्था अत्यंत नाजूक झाली आहे. फक्त आश्वासनांवर त्यांचे पोट भरत नाही. ऑक्टोबर महिन्यात सोलापूर भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यादेखत वाहून गेले आहे. त्याने जमिनीची धूप देखील मोठ्या प्रमाणावर झाली आहे. ग्रामस्थांच्या घरांची पडझड झाली आणि जनावरे सुद्धा दगावली आहेत. अनेकांच्या जगण्याचा आधारच हरवला आहे. 

नुकसानीची पाहणी करण्यासाठी सोलापूर दौऱ्यावर आला होता. त्यावेळी आपण आश्वासन दिले होते की, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाई निधीची रक्कम जमा केली जाईल. परंतु, त्या नुकसानभरपाईची आजही शेतकरी वाट बघत आहेत. ''गंभीर परिस्थितीतील खंबीर सरकार'' असा दिलासा आपल्या बोलण्यातून आपण दिला होता. तो दिलासा प्रत्यक्षात अद्यापही दृष्टिपथात आला नाही. 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने अदा...बुलडाणा : शासन शेतकऱ्यांचा जीवनस्तर उंचविण्यासाठी...
‘कस्तुरी’चा दरवळ मृत्यूनंतरही कायमकोल्हापूर : गेल्या सत्तावीस वर्षांपासून तिने...
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...