agriculture news in Marathi, full day inquiry of Raj Thakare, Maharashtra | Page 3 ||| Agrowon

राज ठाकरे यांची दिवसभर चौकशी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

मुंबई ः कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गुरुवारी (ता. २२) सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीला सामोरे गेले. सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेली त्यांची चौकशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरूच होती. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंबीय ‘ईडी’ कार्यालयाजवळच असलेल्या हॉटेलमध्ये उपस्थित होते. 

मुंबई ः कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गुरुवारी (ता. २२) सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीला सामोरे गेले. सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेली त्यांची चौकशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरूच होती. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंबीय ‘ईडी’ कार्यालयाजवळच असलेल्या हॉटेलमध्ये उपस्थित होते. 

दरम्यान, राज ठाकरे यांच्या ‘ईडी’ चौकशीवर विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर सीबीआय, ‘ईडी’ अशा यंत्रणांद्वारे दहशत बसवण्याचा भाजपचा हा प्रयत्न असल्याची टीका केली जात आहे. या कारवाईमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबईत चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. राज यांचे निवासस्थान असलेला दादर शिवाजी पार्क परिसर आणि दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता. ‘ईडी’ कार्यालयाच्या परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, यासाठी मनसेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धरपकड केली होती. तसेच मुंबईतील काही ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

राज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर आणि उन्मेश जोशी यांनी दादर येथील कोहिनूर मिलची जागा खरेदी केली. त्यासाठी आयएलएफएसकडून ८६० कोटी रुपयांचे कर्ज घेतले. मात्र यात आयएलएफएसचे मोठे नुकसान झाल्याने त्यांनी कंपनीतील आपले शेअर्स विकले. आयएलएफएसकडून शेअर विकण्यात आल्यानंतर लगेचच २००८ मध्ये राज ठाकरे यांनी आपले सर्व शेअर्स विकले. पण त्यानंतरही राज ठाकरे यांचा संबंधित कंपनीत सक्रिय सहभाग असल्याचे सांगत ‘ईडी’कडून चौकशी सुरू झाली. 

शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशीच्या मालकीची ‘कोहिनूर सीटीएनएल’ ही कंपनी दादरमधील ‘सेना भवन’समोरील ‘कोहिनूर स्क्वेअर’ हा जुळ्या टॉवर्सचा प्रकल्प उभारत होती. मात्र ९०० कोटींचे कर्ज न फेडता आल्याने उन्मेष जोशीच्या हातून दादरमधील हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट निसटला. दोन हजार १०० कोटींचा हा प्रोजेक्ट रिअल इस्टेटमधील एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. प्रभादेवीमधील आर्किटेक कंपनी ‘संदीप शिक्रे अॅण्ड असोसिएट्स’ला हा प्रोजेक्ट मिळाला असून त्यांनी यावर काम सुरू केले आहे. या प्रकल्पात कथित आर्थिक अनियमितता झाल्याच्या शक्यतेवरून ईडीने ही चौकशी सुरू केली आहे. 

राज ठाकरे ईडीच्या चौकशीसाठी कार्यालयात हजर होण्यासाठी निघाले तेव्हा राज ठाकरे सहकुटुंब ईडीच्या चौकशीला निघाले आहेत की सत्यनारायणाच्या पूजेला? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण सगळे मिळून माहिती देणार का? हा ड्रामा आहे की सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न? असे प्रश्न ट्विट करत अंजली दमानिया यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, की ‘ईडी’ची चौकशी म्हणजे राजकीय दबावतंत्र आहे. जो कोणीही सरकारविरोधात आवाज उठवतो त्याचा आवाज दडपण्यासाठी हे दबावतंत्र वापरले जाते आहे, अशा संकटाच्या वेळी आपले कुटुंबीय आपल्या पाठीशी उभे राहतात. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासोबत कुटुंबीय का गेले? असा प्रश्न कोणीही उपस्थित करण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

उद्धव ठाकरे यांच्याकडून पाठराखण
यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ईडीच्या या चौकशीतून काही निघेल असे वाटत नाही, असे सांगत राज ठाकरे यांची पाठराखण केली. तर राजकारणात आम्ही सतत एकमेकांविरोधात उभं राहतो, पण संकटसमयी कुटुंब म्हणून सदैव पाठिशी असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. 

इतर ताज्या घडामोडी
अंतिम टप्प्यातील प्रचारामुळे सांगलीत...सांगली : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या...
कोल्हापूर, सिंधुदुर्गातील काही भागांत...कोल्हापूर, सिंधुदुर्ग : गेल्या पंधरा दिवसांच्या...
बोराळे येथे शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाकनाशिक : नांदगाव तालुक्यातील बोराळे येथील शेतकरी...
परभणी जिल्ह्यात हरभऱ्याची २ हजार ९००...परभणी : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (कडधान्य)...
नांदेडमध्ये खरीप पिकांना पावसाचा फटका नांदेड : नांदेड जिल्ह्यातील चार तालुक्यांतील १०...
शेती, शेतकरीप्रश्न हाताळण्यात कुचराईच...शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ज्या...
बियाणे उद्योगाच्या विकासासाठी स्थितीत...बियाणे उद्योगात आपले राज्य पूर्वीपासून अग्रेसर...
हमीभावाने कडधान्य विक्रीसाठी ऑनलाइन...जळगाव ः उडीद, मुगाची शासकीय खरेदी केंद्रांत...
ढगाळ हवामानामुळे साताऱ्यातील...सातारा  ः अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसाचे...
जिल्हा बॅंकांची आर्थिक कोंडी चिंताजनकभूविकास बॅंका मृत्युशय्येवर गेल्यापासून...
प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्जमुंबई ः विधानसभेच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता. २१...
नगर जिल्ह्यात हमीभावाने शेतीमाल...नगर  ः मूग, उडीद, सोयाबीनची हमीभावाने खरेदी...
शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरसकट...अंबाजोगाई, जि. बीड  : भाजपची मनोवृत्ती...
रोजगारनिर्मितीत सरकार अपयशी :...कोल्हापूर  : गेल्या पाच वर्षांत देशातील दोन...
सर्वच शेतीमालावरील निर्यातबंदी...पुणे  ः एकीकडे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट...
राज्यात पावसाची शक्‍यतामहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल  इतका तर...
ऊस पीक सल्ला१) साधारणपणे १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत...
फळमाशी नियंत्रणासाठी घरगुती सापळाभारतामध्ये फळमाशीच्या सुमारे १६ प्रजातींची नोंद...
परभणीत दोडका २५०० ते ४००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...