agriculture news in marathi For full FRP Swabhimani to implement Miss call movement | Page 2 ||| Agrowon

एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीम

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 सप्टेंबर 2021

एकरकमी एफआरपी मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १२ ते ३० सप्टेंबर या कालावधीत मिस कॉल मोहीम राबविण्यात येणार आहे.

कोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे करण्याबाबत राज्यांकडून म्हणणे मागवले आहे, पण त्याला महाराष्ट्राने विरोध केला नाही. याचा अर्थ राज्य सरकार ही ‘एफआरपी’चे तुकडे करण्याला संमती दाखवत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना कधीही हे खपवून घेणार नाही. एकरकमी एफआरपी मिळावी यासाठी संघटनेच्या वतीने १२ ते ३० सप्टेंबर या कालावधीत मिस कॉल मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्यातील ज्या शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी असे वाटत असेल, त्यांनी त्या क्रमांकावर मिस कॉल करावेत, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी (ता. ८) पत्रकार परिषदेत केले

श्री शेट्टी म्हणाले, की केंद्र सरकारच्या वतीने एफआरपीचे तुकडे करण्याबाबत म्हणणे मागविण्यात येत आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारने यास विरोध केला नाही. शेतकऱ्यांचे सरकार म्हणून महाविकास आघाडीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. त्यातील पक्षही एकरकमी एफआरपीबाबत मौन बाळगून आहेत. एफआरपीचे तुकडे केल्यास राज्यभरातील ऊस उत्पादक संकटात येणार आहेत. एफआरपीच्या तुकड्याच्या विरोधात आम्ही लढा उभारणार आहोत.

यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी या कालावधीत मोहिमेमध्ये भाग घेऊन आपली ताकद दाखवून द्यावी असे आवाहन शेट्टी यांनी या वेळी केले. १२ तारखेपासून 8448183751 ८४४८१८३७५१ या क्रमांकावर शेतकऱ्यांनी मिस कॉल द्यावेत, असे आवाहन श्री. शेट्टी यांनी केले. या वेळी जालिंदर पाटील यांच्यासह स्वाभिमानाचे पदाधीकारी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांना बियाण्यांबाबत स्वावलंबी...औरंगाबाद : ‘‘शेतकऱ्यांना बियाण्यांच्या बाबतीत...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पंधरा...परभणी  : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १५...
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टिग्रस्तांसाठी...परभणी ः जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या...
लखीमपूर हिंसाचार : आशिष मिश्राला ‘नोटीस...लखीमपूर, उत्तरप्रदेश ः येथील हिंसाचारप्रकरणी...
सत्तेचा दुरुपयोग सगळ्यांनाच दिसतो आहे...सोलापूर : ‘‘निवडणुकी आधी मला ईडीची नोटीस पाठवली,...
बुलडाण्यात खरीप हंगामात ९५० कोटी...बुलडाणा : अतिवृष्टी, पूर परिस्थितीने यंदाच्या...
साडेचार हजार रुपयांचा पहिला हप्ता उसाला...कुडित्रे, जि. कोल्हापूर : यंदा उसाला उत्पादन...
वादळी पावसामुळे ऊस उत्पादकांचे लाखोंचे...आर्णी, जि. यवतमाळ : संततार पाऊस, वादळाचा...
सांगली जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या सुरू सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्यांना...
पुणे बाजार समिती सेस प्रवेशद्वारावर ...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सह...
आंबा, काजू विमा परतावा मंडलनिहाय जाहीर सिंधुदुर्गनगरी : फळपीक विमा योजनेचा परतावा...
कंबोडियाची शाही नांगरणीशेती व्यवसायावर भर देणाऱ्या कंबोडियामध्ये...
कोरडवाहूमध्ये चिंचेची वनशेतीऔषधी गुणांमुळे चिंचेला भारतीय खजूर असे म्हणतात....
छापेमारीच्या हेतूबाबत आयकर विभागच सांगू...मुंबई ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी...
मराठवाड्यातील २३१ मंडलांत पाऊसपरभणी ः मराठवाड्यातील २३१ मंडलांत बुधवारी (ता. ६...
पुणे जिल्हा बँकेतर्फे रब्बी पीककर्ज...पुणे : खरीप हंगामात सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस...
रत्नागिरी : आंबा, काजू विमा परतावा ५३...रत्नागिरी ः वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांची वीज कापली; लोकप्रतिनिधी...जळगाव ः जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत...
आंबा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी...रत्नागिरी ः पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया...
सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षांवर...सोलापूर : नराळे (ता. सांगोला) येथील आरोग्य...