आरोग्य कर्मचाऱ्यासांठी सुरक्षेची पूर्ण हमी ः जिल्हाधिकारी मांढरे

नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘कोरोना’ बाधित अथवा संशयित रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी संसर्ग प्रतिबंधक ३०० ‘पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट’ उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांची आरोग्य सुरक्षेची पूर्णतः काळजी प्रशासकीय पातळीवर घेतली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
Full guarantee of security for health workers: District Collector

‘कोरोना’च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्याकरिता सर्व संबंधित इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरच्या रविवार (ता. ५) अखेर झालेल्या कामकाजाची माहिती देताना जिल्हाधिकारी श्री. मांढरे बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, पाच हजार एन-९५ मास्क,  ५० हजार थ्री लेअर मास्क, एक हजार एक्स रे फिल्मस जिल्हा सामान्य रुग्णालयास उपलब्ध करून देण्यात आले आहे. बार्नेस स्कूल, देवळाली कॅम्प येथे विलगीकरण हॉस्पिटल तयार करण्यास संबंधित संस्थेने संमती दर्शविलेली त्याठिकाणी २०० खाटांचे नियोजन केलेले आहे. त्याचबरोबर संचारबंदी व लॉकडाऊन पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांची जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी मुद्देनिहाय माहिती दिली.

आजतागायत एक रुग्ण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळून आलेला असून अति जोखीम वर्गवारीमधील १९ लोकांना सिव्हिल हॉस्पिटल, नाशिक आणि मालेगांव तसेच डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय, नाशिक येथे उपचारार्थ दाखल केलेले असून उर्वरित कमी जोखमीच्या वर्गवारीमधील १४० लोकांचा होम क्वारंटाइन मध्ये समावेश आहे.

‘३४ जण रुग्णालयात क्वारंटाइन’ दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या मरकज या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या नाशिक जिल्ह्यातील ८६ लोकांची यादी प्राप्त झालेली असून त्यापैकी ६४ लोकांचा शोध लागलेला असून त्यापैकी ३४ लोकांना रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात आलेले आहे. तसेच २ लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आलेले आहे. १६ लोक हे महाराष्ट्र राज्याच्या बाहेर आहेत. तसेच १४ लोक हे नाशिक जिल्ह्याच्या बाहेर असून उर्वरित २२ लोकांचा शोध सुरू असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी कळविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com