सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्य

सूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात मातीतून आणि विविध खतातून वापर झाल्यास पिकांच्या जीवनचक्रातील सर्व प्रक्रिया सुरळीत होतात.
Zinc deficiency in maize crop
Zinc deficiency in maize crop

सूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात मातीतून आणि विविध खतातून वापर झाल्यास पिकांच्या जीवनचक्रातील सर्व प्रक्रिया सुरळीत होतात.   जस्त  

  • महत्त्वाच्या विकरांचा प्रत्यक्ष घटक आहे. वाढबिंदूची वाढ झपाट्याने होण्यास मदत करते. 
  • कमतरतेमुळे पेरांची वाढ बरोबर होत नसल्यामुळे पात्याचा आकार बदलतो.शिरा स्पष्ट पिवळ्या पडतात. कांड्या-कांड्यातील अंतर कमी होऊन उंची कमी होते, फूल आणि फळधारणा कमी होते. 
  • लोह 

  • हरितद्रव्य तयार करण्यास मदत करते. लोह अनेक विकरांचा घटक असून इलेक्ट्रॉन स्थलांतर क्रियेत आणि इतर जीव रासायनिक क्रियेत भाग असतो.
  • नत्र स्थिरीकरणामध्ये नायट्रोजिनेज या लोहयुक्त विकराचे कार्य असल्याचे नुकतेच सिद्ध झाले आहे.
  • लोह कमतरतेची लक्षणे प्रथम नवीन कोवळी पाने, उमलत्या कळ्या, वाढबिंदू इत्यादींवर स्पष्ट दिसतात. पिकांची कोवळी पाने पिवळी पडतात.  पानातील नसांचा आतील भाग पिवळा होऊन कमतरता अधिक असेल तर पांढरी आणि जर्जर होतात. पाने, कळ्या व वाढबिंदू गळून पडतात. फुले कमी आणि वांझ निर्माण होतात.
  • मँगनीज 

  • पिकांच्या जैविक आणि जीवरासायनिक प्रक्रियांना मँगनीज द्रव्य उत्तेजित करण्याचे कार्य करते. जीवनसत्त्व “क” च्या संश्लेषण क्रियेतदेखील मँगनीजचा मोठा वाटा आहे. प्रथिन संश्लेषण कमतरतेमुळे अमिनो आम्लाचे प्रमाण वाढते आणि नायट्रेटचा साठा वाढतो. याशिवाय ॲडनोजीन ट्राय फॉस्फेटसारख्या ऊर्जा शक्ती पुरविणाऱ्या पदार्थांच्या निर्माण कार्यात मॅगनीजची गरज दिसून आली आहे.
  • मँगनीजच्या कमतरतेमुळे तपकिरी रंगाचे ठिपके पानावर दिसतात. मँगनीजची कमतरता प्रथम कोवळ्या पानावर दिसते. लिंबूवर्गीय फळझाडांच्या पानावर तेलकट डाग पडतात. ज्वारी व बाजरीवर बुरशी येते.
  • तांबे 

  •  नत्र आणि पिष्टमय पदार्थांचे प्रमाण समतोल ठेवण्याचे कार्य तांब्याच्या उपस्थितीत होते. दवबिंदू आणि थंडीपासून बचाव करण्याची  शक्ती पिकांमधील तांब्याच्या प्रमाणावर अवलंबून असते. तांबे अप्रत्यक्षरीत्या प्रकाश संश्लेषण आणि हरितद्रव्य क्रियेत नियंत्रकाचे कार्य करते.
  • तांब्याच्या कमतरतेची लक्षणे प्रथम पिकांतील वाढ बिंदूवर दिसतात. पाने मुडपतात. पानाच्या शिरांमधील भाग पिवळा, पांढरा पडून पिकांची वाढ खुंटते. लिंबूवर्गीय फळझाडांना मर रोग होतो. कांदा आणि भाजीवर्गीय पिकांमध्ये करपा रोग  होतो.
  • संपर्क ः डॉ. संतोष चिक्षे, ७५८८०८२०१४ ( सहाय्यक प्राध्यापक,मृद विभाग, कृषी महाविद्यालय,परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com