agriculture news in Marathi, fund of drought affected farmers stuck in banks, Maharashtra | Agrowon

दुष्काळी लाभार्थींचा निधी बॅंकांनी ठेवला अडवून
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

जळगाव ः जिल्ह्यात २०१८मधील दुष्काळासंबंधीचा निधी १०० टक्के वितरित होऊन लाभार्थी किंवा शेतकऱ्यांपर्यंत पोचलेला नाही. यातच अनेक तालुक्‍यांमध्ये दुष्काळी मदत म्हणून दिलेला निधी कोशागार विभागातून काढला. परंतु, तो पुढे लाभार्थींच्या बॅंक खात्यात न टाकता संबंधित बॅंकेतच असल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भात प्रशासनाने आढावा घेऊन सविस्तर माहिती तयार केली आहे. जेथे निधी बॅंकेत पडून होता, त्या भागातील संबंधितांना हा निधी बॅंकेत का पडून आहे किंवा बॅंकेत का ठेवला? असा जाब विचारल्याची माहिती आहे. 

जळगाव ः जिल्ह्यात २०१८मधील दुष्काळासंबंधीचा निधी १०० टक्के वितरित होऊन लाभार्थी किंवा शेतकऱ्यांपर्यंत पोचलेला नाही. यातच अनेक तालुक्‍यांमध्ये दुष्काळी मदत म्हणून दिलेला निधी कोशागार विभागातून काढला. परंतु, तो पुढे लाभार्थींच्या बॅंक खात्यात न टाकता संबंधित बॅंकेतच असल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भात प्रशासनाने आढावा घेऊन सविस्तर माहिती तयार केली आहे. जेथे निधी बॅंकेत पडून होता, त्या भागातील संबंधितांना हा निधी बॅंकेत का पडून आहे किंवा बॅंकेत का ठेवला? असा जाब विचारल्याची माहिती आहे. 

२०१८ मध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतर मदत निधी देण्यास सरकारने सुरवात केली. या अंतर्गत मदत निधी म्हणून जिल्ह्यात सुरवातीला ३८६ कोटी रुपये निधी आला. यातील कमाल निधी संबंधित तालुक्‍यात वितरित करण्यात आला. यात अनेक भागांत लाभार्थींची नावे, बॅंक खाते व इतर माहितीमधील तांत्रिक अडचणींमुळे निधी पडून राहिला. हा पडून राहिलेला निधी शासनाकडे परत पाठविणे किंवा त्याची माहिती तयार करून ती शासनाकडे सादर करणे आवश्‍यक होते. हा निधी संबंधित बॅंकांनी निलंबित खात्यात राहू दिला.

हा निधी संबंधित तालुक्‍यातील अधिकाऱ्याच्या आहरण संवितरण खात्यात असायला हव्या होत्या. त्या बॅंकेच्या निलंबित खात्यात राहिल्याने त्यासंबंधीची माहिती जुळविणे वित्तीय विभागांना अडचणीचे झाले. याबाबत वेळोवेळी आढावा घेऊन संबंधित रकमेची माहिती तालुकास्तरावरून जुळविली नसल्याने निधी वितरणासंबंधी नेमकी माहिती प्रशासनाकडे पोचली नाही. ही बाब लक्षात घेता लाभार्थींची माहिती व्यवस्थित असेल, कुठल्याही अडचणी बॅंकेत नसतील याची खात्री करूनच आवश्‍यक तो निधी कोषागार विभागातून काढून (आहरीत करून) नंतर तो संबंधित लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यासाठी बॅंकेत द्यावा. जो निधी बॅंकेत निलंबित खात्यात पडून राहील. लाभार्थींना दिला जाणार नाही, त्यासंबंधी अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. वेळ आल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने संबंधितांना दिल्याची माहिती मिळाली.

 

इतर अॅग्रो विशेष
महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी लागवडीस वेगसातारा  ः जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, वाई...
संत्र्याच्या आंबिया बहराला गळती; भाव...अकोला : संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर...
दुधाचे थकीत अनुदान देण्याच्या हालचालीपुणे: राज्यातील डेअरी उद्योगांचे अडकलेले...
अमरावती विभागात सोयाबीन उत्पादकता घटलीअमरावती  ः गेल्या काही वर्षांत कापसाला...
‘महाॲग्री ते महाॲग्रीटेक’ एक स्वप्नरंजन राज्यात शेतकऱ्यांची सर्व कामे ऑनलाईन होतील असे एक...
शेण पावडरपासून कलात्मक वस्तूंची...सुमारे ३८ देशी गायींचे संगोपन करीत नागपूर येथील...
शेततळ्यातील पाण्यावर फुलले शेडनेटमधील...पावसाचे कायम दुर्भिक्ष, त्यामुळे शेती अर्थकारणाला...
राज्यात गाजर ११०० ते ८००० रुपये...जळगावात ११०० ते १८०० रुपये दर जळगाव कृषी...
ऋतुचक्र बदलया वर्षीचा मॉन्सून अनेक बाबींनी वैशिष्ट्यपूर्ण...
प्रतिष्ठेचं वलय होतंय द्राक्ष...द्राक्ष शेतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय...
उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला...औरंगाबाद: हमीदराने उडीद, मूग, सोयाबीन...
सांगली जिल्ह्यात डाळिंबावर रसशोषक...सांगली : मृग हंगाम धरलेल्या बहाराच्या डाळिंबाच्या...
कडधान्य आयातीला मुदतवाढीचा प्रस्तावनवी दिल्लीः देशात यंदा खरिप काडधान्य पिकांची...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे: वाढलेल्या उन्हामुळे राज्यात चटका वाढला आहे...
परतीचा मॉन्सून आठ दिवसात माघारीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
आदर्श वनसंवर्धनातून ग्रामविकास साधलेले...वनसंपत्तीचे संवर्धन, वनविकासासह शेतीतही दिशादर्शक...
येतो मी... मॉन्सूनने घेतला देशाचा निरोप...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
शेतकऱ्यांच्याच कपाळावर पुन्हा ‘मिऱ्या’दिनांक ३ जुलै २०१९ रोजी केरळचे खासदार डीन...
आश्वासनांचा पाऊसराज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम...