जिल्हा परिषद शाळांतील बंद वीजपुरवठ्यासाठी विशेष निधी

ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना भौतिक, शैक्षणीक सुविधेसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळांत वीज जोडणी दिली. मात्र वीजबिले थकल्याने सध्या राज्यातील तब्बल १० हजार ६७१ शाळांतील वीजपुरवठा बंद आहे.
zp
zp

नगर : ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना भौतिक, शैक्षणीक सुविधेसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळांत वीज जोडणी दिली. मात्र वीजबिले थकल्याने सध्या राज्यातील तब्बल १० हजार ६७१ शाळांतील वीजपुरवठा बंद आहे. सध्या कायमस्वरूपी बंद व चालू मिळून सुमारे १२ कोटी रुपयांची शाळांकडे थकबाकी आहे. त्यातील कायमस्वरूपी वीजपुरवठा बंद असलेल्या थकीत देयकासाठी विशेष बाब ५ कोटी ८८ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र कायमस्वरूपी वीजपुरवठा बंद असलेल्या शाळांत संगणकासह इतर बाबींना अडचणी येत आहेत.  जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांना संगणकासह इतर शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी प्रत्येक शाळेला वीजजोडणी करण्यात आली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांतील ग्रामीण विद्यार्थ्यांना ही संगणकाचे शिक्षण मिळू लागले याशिवाय वीज उपलब्ध झाल्यामुळे इतर साहित्याचा वापर होऊ लागला. मात्र गेल्या काही दिवसापासून वीजबिल थकल्याने राज्यातील सुमारे दहा हजार ६७१ वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.  राज्याच्या शालेय व क्रीडा विभागाने काढलेल्या अभ्यासात ही बाब स्पष्ट केली आहे. त्यात सर्वाधिक बाराशे ३१ शाळा सोलापूर जिल्ह्यातील असून, नगर जिल्ह्यातील ४४६ शाळा आहेत. पुण्यातील ७८०, सांगलीतील ६०५, नाशिकमधील ७७३, औरंगाबादमधील ५६९ शाळांचा समावेश आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा बंद असलेल्या शाळांतील वीजपुरवठा सुरू करण्यासाठी शासनाने वीज देयकासाठी पाच कोटी ८८ लाख रुपयांची विशेष बाब म्हणून तरतूद केली आहे. वीज देयक थकल्यामुळे शाळांतील वीजपुरवठा बंद असल्याने ग्रामीण भागातील शाळेत मात्र अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे बंद वीजपुरवठा तातडीने सुरू करण्यासाठी निधी देऊन प्रयत्न प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत.

प्रतिक्रिया वीजपुरवठा बंद असलेल्या शाळांतील वीजपुरवठा सुरू करण्यासाठी शासनाने विशेष बाब म्हणून निधी दिलेला आहे. नगर जिल्ह्यातील वीजपुरवठा बंद असलेल्या शाळांची संख्या मात्र मोठी असल्याने व दिलेला निधी कमी आहे. त्यामुळे या निधीत वाढ करावी आणि सर्वच्या सर्व बंद पुरवठा असलेल्या शाळांतील वीजपुरवठा सुरू करावा.  - राजेश परजणे, सदस्य जिल्हा परिषद, नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com