जळगाव : अधिकाऱ्यांच्या उदासीनतेने जलयुक्तचा निधी अखर्चित

जळगाव : अधिकाऱ्यांच्या उदासीनतेने जलयुक्तचा निधी अखर्चित
जळगाव : अधिकाऱ्यांच्या उदासीनतेने जलयुक्तचा निधी अखर्चित

जळगाव : शासनाकडून यंदा जिल्ह्याला तेरा कोटी रुपयांचा विशेष निधी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामासंबंधी मिळाला होता. हा निधी खर्च करण्यासाठी मार्चअखेरपर्यंत मुदत होती. हा निधी खर्च करण्यासाठी प्रत्येक विभागाला त्यांच्या मागणीनुसार निधीवाटप करण्यात आला होता. मात्र, अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हा निधी खर्च झालेला नाही. तसेच, आता आचारसंहिताही लागू झालेली असल्याने हा निधी खर्च होणे अशक्‍य आहे.  इतका मोठा निधी शासनाकडे हस्तांतरित झाल्याने अधिकाऱ्यांची कामाबाबतची उदासीनता दिसून येत आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत शासनाकडून जिल्ह्याला मोठा निधी मिळाला होता. या निधीबरोबरच गेल्या वर्षी शासनाकडून सिंचनासाठीची आवश्‍यक कामे करण्यासाठी तेरा कोटी रुपये विशेष निधी मिळाला होता. विशेष म्हणजे यात कृषी विभागातील निधी सर्वाधिक हस्तांतरित झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.  जलपातळी वाढविण्यासाठी तसेच संपूर्ण जमीन ओलिताखाली यावी, यासाठी शासनाकडून जलयुक्त शिवार ही योजना राबविण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत दरवर्षी शासनाकडून जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच यासोबत जलसंधारण, सामाजिक वनीकरण, नाला, बंधारे व सिंचनाची आवश्‍यक कामे करण्यासाठी निधी प्राप्त होत असतो.  लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्‍यता असल्याने मार्चच्या आधीच या निधीतून कामे होणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. मागील वित्तीय वर्षातील निधीमधीलच पाच कोटींचा निधी शिल्लक होता. त्याचबरोबर तेरा कोटींच्या निधीतून दमडीचेही काम न झाल्याने संपूर्ण निधी शासनाकडे हस्तांतरित करण्यात आल्याची स्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com