agriculture news in marathi; fund requirement for seven drought hit talukas, yavatmal, maharashtra | Agrowon

यवतमाळ जिल्ह्यातील सात दुष्काळग्रस्त तालुक्‍यासाठी हवेत २१२ कोटी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 जुलै 2019

यवतमाळ ः जनरेट्यामुळे दुष्काळ यादीत नव्याने समावेश करण्यात आलेल्या सात तालुक्‍यांसाठी २१२ कोटींची गरज आहे. तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला पाठविला आहे. ही मदत मिळाल्यास आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलास मिळण्यास मदत होणार आहे. 

यवतमाळ ः जनरेट्यामुळे दुष्काळ यादीत नव्याने समावेश करण्यात आलेल्या सात तालुक्‍यांसाठी २१२ कोटींची गरज आहे. तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला पाठविला आहे. ही मदत मिळाल्यास आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलास मिळण्यास मदत होणार आहे. 

राज्य शासनाने जिल्ह्यातील १६ पैकी नऊ तालुक्‍यांमध्येच दुष्काळाची घोषणा केली होती. जिल्ह्यातील सर्वच तालुके दुष्काळाच्या झळा सोसत असताना हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा असल्याचा आरोप यामुळे होत होता. शासनाच्या निषेधासाठी देखील अनेक आंदोलन या पार्श्‍वभूमीवर करण्यात आली. त्याची दखल घेत शासनाने उर्वरित सात तालुक्‍यातही दुष्काळ जाहीर केला. आर्णी, दिग्रस, झरी, वणी, घाटंजी, नेर आणि पुसद अशा सात तालुक्‍यांचा त्यामध्ये समावेश आहे. महसूल यंत्रणेने या तालुक्‍यांचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला. हा अहवाल आता राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. त्यानुसवार २१२ कोटी २१ लाख ४२ हजार रुपयांच्या मदतनिधीची गरज या सात तालुक्याकरिता भासणार आहे. एक लाख ८८ हजार ३१० शेतकऱ्यांना याचा लाभ होणार  आहे. हेक्‍टरी सहा हजार ८०० रुपयांप्रमाणे दोन हेक्‍टरसाठी ही मदत दिली जाईल. 

संत्रा बागायतदार उपेक्षित
वाढत्या तापमानाचा फटका जिल्ह्यातील संत्रा, मोसंबी बागांना बसला. या संदर्भाने शेलोडीचे शेतकरी विलास पाटील यांनी थेट कृषी आयुक्‍तालय स्तरावर तक्रार केली. कृषिमंत्र्यांना थेट फोनवरुनही त्यांनी संपर्क साधला. परंतु कोणताच दिलासा मिळाला नसल्याचे ते सांगतात. वाळलेल्या संत्रा बागांसाठी तत्काळ भरपाईची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे संत्रा क्षेत्र जेमतेम असल्याने कृषी विभागाच्या रेकॉर्डवरच त्याची नोंद नसल्याचे सांगितले जाते. 

असा आहे मदतीचा प्रस्ताव

तालुका अपेक्षित मदत 
आर्णी १९ कोटी ९६ लाख
दिग्रस २० कोटी ४ लाख
झरी २१ कोटी २६ लाख
घाटंजी ३१ कोटी ८१ लाख
वणी ४४ कोटी ३० लाख
नेर ३० कोटी ८८ लाख
पुसद ३७ कोटी ८ लाख

 


इतर बातम्या
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...