agriculture news in marathi, fund sanction for water conservation work, pune, maharashtra | Page 2 ||| Agrowon

पुणे जिल्ह्यात जलसंधारण उपचारांसाठी ७० लाखांचा निधी मंजूर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

पुणे   ः आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेअंतर्गत (ओटीएसपी) चालू वर्षी आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतावर मृद व जलसंधारणाचे विविध उपचार राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पुणे जिल्ह्यातील इच्छुक आदिवासी शेतकऱ्यांनी संबंधित कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायकांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

पुणे   ः आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेअंतर्गत (ओटीएसपी) चालू वर्षी आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतावर मृद व जलसंधारणाचे विविध उपचार राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पुणे जिल्ह्यातील इच्छुक आदिवासी शेतकऱ्यांनी संबंधित कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायकांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्नाचे इतर कायमस्वरूपी साधन नसते. त्याचे संपूर्ण क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठीच्या मर्यादा लक्षात घेता कृषी उत्पन्नात वाढ करण्यासाठी पाणलोट विकास कार्यक्रम राबविण्यात येतो. आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे राहणीमान सुधारणे व त्यांचे स्थलांतररोखणे यासाठी शंभर टक्के अनुदानावर ही योजना राबविण्यात येते.

या योजनेअंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांनी संमती घेऊन त्यांच्या वैयक्तिक क्षेत्रावर मृद व जलसंधारणाचे विविध उपचार घेण्यात येतात. यामध्ये सलग समतल चर, कंपार्टंमेंन्ट बंडिंग, अनघड दगडी बांध, शेततळे, मजगी, जुनी भात शेती दुरुस्ती व सामूहिक स्वरूपाचे माती नाला बांध, सिंमेट नाला बांध अशा विविध स्वरूपाचे उपचार घेण्यात येतात. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी आदिवासी असल्याचा दाखला, सात - बारा उतारा व आठ अ उतारा अशी कागदपत्रे आवश्यक आहेत. या योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. 

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड  : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड,...
मनमाड बाजार समितीमध्ये नवीन मका विक्री...नाशिक : नांदगाव तालुक्यात मका काढणीला सुरवात झाली...
खरीप मळण्यांना पावसाचा फटकाकोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात...
शेतकरीकन्या मंजूषा पगारची भारतीय बेसबॉल...नाशिक : मालेगाव तालुक्यातील विराणे येथील शेतकरी...
खानदेशात ज्वारीची दिवाळीपूर्वी कापणी...जळगाव ः शासनाकडून भरडधान्य म्हणजेच ज्वारी, मका...
व्यापाऱ्यांकडून मुगाची कमी भावाने खरेदीनांदुरा, जि. बुलडाणा : पावसाने उघडीप दिल्याने...
‘पंदेकृवि’मध्ये जागतिक कापूस दिन साजराअकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात...
को-मार्केटिंगची पायाभरणी करणारा माजी...पुणे : "राज्यातील शेतकऱ्यांना को-मार्केटिंगच्या...
ग्रामपंचायत केंद्रचालकांचे मानधन...पुणे : राज्यातील हजारो ग्रामपंचायतींमधील...
मूल्यवर्धनासह पीकनिहाय गुंतवणुकीची गरज...ग्रामीण अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे...
ग्रामीण भागातील सांडपाण्याचे व्यवस्थापन शहर वा गाव कोणतंही असो, सांडपाणी व्यवस्थापनाचे...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्‍...महाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवरील हवेचा दाब...
बार्शीटाकळी तहसील कार्यालयात पीकविमा...अकोला  ः खरीप हंगामात राबविल्या जात असलेल्या...
ताप, अंगदुखीवर चुंच उपयुक्त स्थानिक नाव      चुंच,...
गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी ...सध्या कापूस पीक हे फुलोरा ते बोंडे लागण्याच्या...
खानदेशात उडदाचे एकरी एक क्विंटलपर्यंत...जळगाव ः खानदेशातील शेतकऱ्यांसाठी उडदाचे पीक यंदा...
समुद्रात जाणारे पाणी वळवून वाद मिटवणारः...नगर : नगर-नाशिक जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी...
वाया जाणाऱ्या उष्णतेपासून विद्युत ऊर्जा...कारचा एक्झॉस्ट पाइप, औद्योगिक प्रक्रियामध्ये...
पुणे जिल्ह्यात वादळी पावसाचा दणका सुरूचपुणे : पुणे जिल्ह्याच्या विविध भागांत...
नाशिक जिल्ह्यातील वागदर्डी धरण चार...नाशिक : मागील महिन्यापासून होत असलेल्या पावसामुळे...