agriculture news in marathi, funding not available for smart village scheme, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यात स्मार्ट ग्राम योजनेचा निधी रखडला
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 12 एप्रिल 2018
जळगाव  ः स्मार्ट सिटी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जिल्हा परिषदेअंतर्गत स्मार्ट ग्राम योजना आणली, परंतु या योजनांचा निधी रखडल्याने योजनेत निवड झालेल्या गावांना विकासकामांची प्रतीक्षा आहे. ही योजना फक्त गाजावाजा करण्यासाठीच सुरू केली का, असा प्रश्‍न ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित करू लागले आहेत. 
 
जळगाव  ः स्मार्ट सिटी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जिल्हा परिषदेअंतर्गत स्मार्ट ग्राम योजना आणली, परंतु या योजनांचा निधी रखडल्याने योजनेत निवड झालेल्या गावांना विकासकामांची प्रतीक्षा आहे. ही योजना फक्त गाजावाजा करण्यासाठीच सुरू केली का, असा प्रश्‍न ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित करू लागले आहेत. 
 
२०१६ मध्ये ही योजना शासनाने हाती घेतली. ज्या गावांनी स्वच्छता, ग्रामपंचायतींमधील दप्तर व इतर घटकांमध्ये चांगले काम केले, विकासकामे नियमानुसार घेतली, त्यातून तालुकास्तरावर गावांची निवड झाली. तालुकास्तरावर जे गाव प्रथम आले, त्या गावाची निवड या स्पर्धेत केली.
 
या निवडीनंतर जिल्हास्तरावर स्पर्धा झाली. त्यात सहभागी झालेल्या १५ गावांमधून अमळनेर तालुक्‍यातील पिंगळवाडे व पाचोरा तालुक्‍यातील सारोळ बुद्रुक या दोन गावांची निवड झाली. या दोन्ही गावांना जिल्हा परिषदेने संयुक्तपणे पहिल्या क्रमांकाचे बक्षीस जाहीर केले आहे. ४० लाख रुपये एवढा निधी या दोन्ही गावांना संयुक्तपणे मिळणे अपेक्षित आहे; परंतु हा ४० लाख रुपये निधी मिळालेला नाही.
 
जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी ज्या १५ गावांची निवड झाली होती, त्यातील सर्व १५ गावांना प्रत्येकी १० लाखांचे बक्षीस मिळाले आहे; परंतु जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या पिंगळवाडे व सारोळा बुद्रुक या गावांना मात्र निधी मिळालेला नाही. एक वर्ष झाले तरीही निधीसंबंधीच्या हालचाली दिसत नसल्याने ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
 
स्मार्ट ग्राम योजनांना अपारंपरिक ऊर्जा, पर्यावरण संवर्धन, नवतंत्रज्ञान, स्वच्छता, उत्तम व्यवस्थापन यासंबंधी प्रोत्साहन देण्यासाठी हाती घेतली. जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या गावांना निधीची प्रतीक्षा आहे; परंतु निधी मिळावा यासाठी कोणताही पाठपुरावा जिल्हा परिषद प्रशासन शासनाकडे करीत नसल्याच्या तक्रारी सदस्यांनी केल्या आहेत.
 
जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसमोरही हा विषय मांडलेला नाही. त्यामुळे त्याची चर्चा कोणत्याही बैठकीत, आढावा चर्चेत झालेली नाही. या प्रकारामुळे निधी रखडल्याचा आरोपही आता केला जात आहे. निधी जसा रखडला, तसे प्रथम आलेल्या गावांना पुरस्कारही प्रदान केलेला नाही. १ मे रोजी हा पुरस्कार वितरित होण्याची अपेक्षा होती; परंतु १ मेचा मुहूर्त हुकला, आता पुढच्या १ मे रोजी हा पुरस्कार देणार की नाही, असा प्रश्‍नही ग्रामस्थ व जिल्हा परिषदेचे पदाधिकारी उपस्थित करीत आहेत.
 

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...