agriculture news in Marathi fundnvis has importance in BJP Maharashtra | Agrowon

फडणवीस यांचे वर्चस्व अबाधित 

टीम अॅग्रोवन
रविवार, 10 मे 2020

विधानपरिषदेच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जाणारे माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांचे पत्ते भाजपने साफ केले आहेत.

मुंबई: विधानपरिषदेच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जाणारे माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांचे पत्ते भाजपने साफ केले आहेत. उमेदवारी नाकारल्याने पक्षातील जुन्या नेत्यांचे महत्त्व कमी झाले असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रदेश भाजपवरील वर्चस्व अबाधित असल्याचा संदेश भाजप पक्षश्रेष्ठींनी दिला आहे. 

फडणवीस सरकारमध्ये भोसरीतील जमीन घोटाळ्याच्या आरोपावरुन महसूल मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागल्यापासून एकनाथ खडसे हे पक्षात दुर्लक्षित आहेत. विधानसभा निवडणुकीतही त्यांना उमेदवारी नाकारून त्यांच्या मुलीला तिकीट देण्यात आले होते. निवडणुकीत मुलीचा पराभव झाल्यानंतर त्याचे खापर त्यांनी पक्षातील नेत्यांवर फोडले होते. यावेळी खडसे यांनी विधानपरिषदेची उमेदवारी मागितली होती. 

विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांनी मध्यंतरी बंडाचा पवित्रा घेतला होता. त्यानंतर त्या पुन्हा सक्रिय झाल्या होत्या. विधानपरिषदेत सरकारच्या विरोधात संघर्ष करणारे धारदार नेतृत्व नाही. त्यामुळे पंकजा यांना विधानपरिषदेवर पाठवून विरोधी पक्षनेतेपद दिले जाईल, असे मुंडे समर्थकांना वाटत होते. मात्र, पंकजा मुंडेंच्या उमेदवारीचा विचार न झाल्याने समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. 

विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आले होते. त्यामुळे विधानपरिषदेच्या उमेदवारीकडे त्यांचे डोळे लागले होते. मात्र, खडसे, मुंडेंप्रमाणे या तीनही जणांच्या नावावर फुली मारण्यात आली. 

दिल्ली दरबारी फडणवीस यांचे वजन... 
दरम्यान, भाजपच्या विधानपरिषद उमेदवारीच्या यादीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव असून त्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या दरबारी त्यांचे वजन असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. भाजपचे चारही उमेदवार हे फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांच्यासारख्या नेत्यांना विधान परिषदेचा दरवाजा तूर्तास बंद करून फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या पदावर गंडांतर येणार नाही याची काळजी घेतल्याचे बोलले जाते. 
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...