प्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त झालेला निधी सर्व खात्यांनी वेळेत व योग्यरितीने खर्च करावा ः  भुजबळ
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त झालेला निधी सर्व खात्यांनी वेळेत व योग्यरितीने खर्च करावा ः भुजबळ

नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त झालेला निधी जनतेच्या अपेक्षापूर्तीसाठी सर्व खात्यांनी वेळेत व योग्यरितीने खर्च करण्यात यावा’, अशी सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृह येथे सोमवारी (ता. २७) आयोजित जिल्हा नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार डॉ. भारती पवार, जि. प. उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, आमदार दिलीप बनकर, हिरामण खोसकर, सुहास कांदे, नरहरी झिरवळ, माणिकराव कोकाटे, सीमा हिरे, देवयानी फरांदे, नितीन पवार, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, ॲड. राहुल ढिकले, जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी उज्ज्वला बावके, सहायक जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद, पंकज आशिया, जिल्हा नियोजन अधिकारी योगेश चौधरी आदी उपस्थित होते.  या वेळी भुजबळ म्हणाले, की गेल्या दहा दिवसांत प्राप्त निधीच्या तुलनेतील खर्चाची टक्केवारी वाढली असून ती २३ टक्के वरून ४० टक्क्यांपर्यंत गेली आहे. राज्याची सरासरी ३४ टक्के दरम्यान आहे. ७९१.२३ कोटी मंजूर नितव्ययापैकी ४७४.७४ कोटींचा निधी प्राप्त असून त्यांपैकी ३१४.७३ कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. सर्वसाधारण योजना ७८ कोटी, आदिवासी उपयोजना ७३.२४ आणि गंगापूर बोट क्लब, कलाग्राम, शिवाजी स्टेडियम, जिल्ह्याची १५० वर्षपूर्ती, साहसी प्रशिक्षण केंद्र अंजनेरी अशा विशेष प्रकल्पांसाठी ३४ कोटी असे एकूण १८५.२४ कोटी रुपयांच्या विशेष वाढीव निधीची मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मागील अपूर्ण प्रकल्पांना पूर्णत्वास नेण्याचादेखील प्रयत्न करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विजेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वीज वितरण विभागासोबत प्रथमतः जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली बैठक होईल व त्यानंतर पालकमंत्री यांचे अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देश श्री. भुजबळ यांनी दिले. या बैठकीत आदिवासी भागातील अंगणवाडी इमारत, विद्युत ट्रान्सफॉर्मर, ग्रामीण रस्ते यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीसाठी जिल्हा परिषद सभापती, विभागप्रमुख उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com