विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही ः उद्धव ठाकरे

Funds will not be reduced for development works
Funds will not be reduced for development works

औरंगाबाद : जनतेचे प्रश्न स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करणे आवश्‍यक आहे. प्रत्येक जिल्ह्यातील विकासकामांचे वर्गीकरण करून प्राधान्यक्रम ठरवून त्याप्रमाणे आवश्‍यक निधीची मागणी करावी. जनतेच्या विकासासाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी मिळून अथक प्रयत्न करणे, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ही विकासकामे करण्यासाठी निधी अपुरा पडू दिला जाणार नाही, असे आश्‍वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. 

मराठवाड्याच्या राजधानीच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवार (ता. ९) व शुक्रवार (ता. १०) दरम्यान औरंगाबाद, परभणी, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांसह औरंगाबाद शहर महापालिकेचा आढावा घेतला. महाराष्ट्र एक्‍स्पो २०२० च्या उद्‌घाटनानंतर सुरू झालेले बैठकांचे सत्र रात्री उशिरा व शुक्रवारी दुपारपर्यंत सुरू होते. 

पिण्याचे पाणी, त्याविषयीच्या योजनांची स्थिती, रस्ते, पायाभूत सुविधा, योजनांची स्थिती, उद्योगांची स्थिती व गरज, आदी विषय या बैठकांच्या प्राधान्याने अजेंड्यावर होते. या बैठकांच्या माध्यमातून शासन प्रशासनाचा आवाका, जिल्ह्यांचे प्रश्न, त्यांची सोडवणूक करण्यासाठी आवश्‍यक बाबी, प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठीचा जिल्हा, विभाग स्तरावरील प्रशासनाचा आवाका, शासनाने दखल देण्याच्या बाबी, प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रस्ताव वा निधींची तरतूद करण्याची आवश्‍यकता व त्याविषयीचे अधिकार, करावयाच्या उपाययोजना आदींविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या आढावा बैठकांच्या माध्यमातून केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

या आढावा बैठकांना पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, चारही जिल्ह्यांतील काही खासदार, आमदार, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विविध विभागांचे प्रधान सचिव, सचिव तसेच औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, चारही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्‍त, जिल्हास्तरावरील विविध विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. काही विभागांचे प्रधान सचिव व सचिव थेट मंत्रालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीस उपस्थित होते.  

मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच औरंगाबादेत आलेल्या उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी एमजीएम परिसरात स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होणाऱ्या नियोजित जागेची पाहणीही केली. निसर्गाला पूरक असे वैविध्य व वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपाचे स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी स्मारक पाहणीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना दिले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com