भारत मातेचे सुपुत्र मेजर शशिधारण अनंतात विलीन

भारत मातेचे सुपुत्र मेजर शशिधारण अनंतात विलीन
भारत मातेचे सुपुत्र मेजर शशिधारण अनंतात विलीन

पुणे : पाणावलेल्या डोळ्यांनी मेजर शशिधारण नायर यांना अखेरचा निरोप देण्यात आला. भारत मातेचे सुपुत्र अनंतात विलीन झाले. मेजर नायर यांच्या मुलाने पार्थिवाला मुखाग्नी दिला.

मूळचे केरळचे असलेले नायर पुण्याच्या खडकवासला येथे राहत होते. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हजारो तरुण उपस्थित होते. ''मेजर नायर झिंदाबाद'', 'अमर रहे, अमर रहे, शशी नायर अमर रहे' घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, खासदार अनिल शिरोळे, आमदार भीमराव तापकीर यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.

शनिवारी संध्याकाळी नायर यांचा मृतदेह लष्करी विमानाने पुण्यात आणण्यात आला. घोरपडी येथील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे त्यांना लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे मानवंदना देण्यात आली. मेजर जनरल एन. एस. लांबा यांनी नायर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर लष्करी अधिकारी, सैनिक व नायर कुटुंबीय तसेच नागरिकांनीही त्यांना आदरांजली वाहिली. पत्नी तृप्ती या आजारी असल्याने खडकी येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना व्हीलचेअरवरूनच या ठिकाणी आणण्यात आले होते. 

नायर यांचे मूळ गाव केरळ राज्यातील एर्णाकुलम जिल्ह्यामधील चेंगामनाड हे आहे. ते गेल्या ३० वर्षांपासून येथे राहतात. त्यांचे वडील नोकरीनिमित्त खडकवासला येथे आले. केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्थेत ते रोखपाल होते. दहा वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यांची आई लता या गृहिणी आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव तृप्ती असून, त्या संगणक अभियंता आहेत. काही दिवसांपासून त्यांना दिव्यांगत्व आले आहे. बहीण सीना या पदवीधर आहेत. नायर हे ४० दिवसांची सुटी संपवून, ३ जानेवारीला ते सीमेवर रुजू झाले होते. नायर यांचा जन्म खडकवासला येथे १९८५ मध्ये झाला. येथील केंद्रीय विद्यालयात त्यांचे शालेय शिक्षण झाले. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण सुरू असतानाच त्यांनी एनसीसीत भाग घेतला. तेथे त्यांना उत्कृष्ट स्नातक म्हणून गौरविले होते. पदवीनंतर त्यांनी डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमी (आयएमए) मधून प्रशिक्षण पूर्ण केले. १० डिसेंबर २००७ रोजी ते सैन्यात दाखल झाले होते. पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com