Agriculture news in marathi Funeral of onion export ban ordinance in Malegaon | Agrowon

मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या अध्यादेशाची अंत्ययात्रा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

मालेगाव, जि. नाशिक :हजारो शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी कांदा निर्यातबंदीचा निषेध करुन त्याच्या आध्यादेशाची सोमवारी (ता.२१) अंत्ययात्रा काढली.

मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला चांगला भाव मिळून शेतकऱ्यांना थोडाफार फायदा होण्यास सुरवात झाली. तोच केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी लादून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी कांदा निर्यातबंदीचा निषेध करुन त्याच्या आध्यादेशाची सोमवारी (ता.२१) अंत्ययात्रा काढली. 

कांदा निर्यातबंदी निषेधार्थ अंत्ययात्रेला सटाणा नाका भागातून सुरवात झाली. तर, सटाणा रस्ता, साठफुटी रस्त्यावरुन तिरडी मोर्चा तहसिलदार कार्यालयावर पोचला. या ठिकाणी पोलिसांनी मोर्चा अडविला. यावेळी शासनाच्या धोरणाविरुध्द शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

राज्य कांदा उत्पादक संघटनेचे तालुकाध्यक्ष शेवाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसिलदारांना निवेदन दिले. केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यात बंदी आदेश त्वरित मागे घ्यावा. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय त्वरित दूर करून न्याय मिळवून द्यावा, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
यावेळी प्रतिनिधिक स्वरूपात शेतकरी ट्रॅक्टरवर गळफास लावून आत्महत्या करीत असल्याचे दाखविण्यात आले. मोर्चात कांदा उत्पादक शेतकरी नरेंद्र शेवाळे, मधुकर शेवाळे, विरकुमार शेवाळे सहभागी झाले. 

केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांना शेती विकासाचे स्वप्न दाखवून पुन्हा सत्तेत आले. सरकारची प्रत्यक्ष कृती मात्र शेतकरी विरोधी आहे.
- चंद्रकांत शेवाळे, तालुकाध्यक्ष, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना


इतर ताज्या घडामोडी
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यातून मॉन्सून परतीच्या वाटेवर; पाऊस...महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या वाटेवर...
सांधेदुखी, सूजेवर आरोग्यदायी गोखरूगोखरू ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला...
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु...सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे...
खानदेशात पावसाने दाणादाण सुरूचजळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम...
जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य...बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला...
सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे...सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे...
साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर...सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने...