केळी पिकवून विकण्यासाठी अखेर शेतकऱ्याकडून शेतातच भट्टी

दर घसरल्यामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी भट्टी लावली. पिकविलेली केळी विकणार आहे. यामुळे थोडे कष्ट वाढले आहेत. परंतु, यामुळे ग्राहकांना दर्जेदार केळी मिळेल. शिवाय चांगले दर मिळून फायदा होईल. - विलास बाबर, सुरपिंपरी,जि.परभणी.
Furnace in the field for grinding and selling bananas in Surpimpri
Furnace in the field for grinding and selling bananas in Surpimpri

परभणी : ‘लॅाकडाऊन’मुळे केळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मागणी कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या परिस्थितीत सुरपिंपरी (ता.परभणी) येथील शेतकरी विलास बाबर यांनी पारंपरिक पध्दतीने भट्टी लावली आहे. त्यांनी केळी पिकवून स्वतः विक्री करण्याचा पर्याय निवडला आहे. त्यातून निश्चितच फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

‘लॅाकडाऊन’मुळे ठिकाठिकाणचे आठवडे बाजार बंद आहेत. फळे-भाजीपाला मार्केटमधील आवक वाढल्याने घाऊक विक्रीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दर कमी झाल्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अनेक शेतकरी घरपोच विक्रीचे पर्याय स्विकारत आहेत. रेल्वे, एस.टी. बसव्दारे होणारी सार्वजनिक वाहतूक बंद आहे. वाहन परवाने काढून अनेक शेतकरी शेतमाल विविध ठिकाणच्या बाजारपेठेत पोचवत आहेत. परंतु, वाहनांच्या भाड्यात झालेली वाढ, प्रवासा दरम्यान जेवणाची होणारी हेळसांड आदी कारणांमुळे मर्यादा येत आहेत. 

बाबर यांच्याकडे दीड एकर क्षेत्रावर केळीची पिल बाग आहे. शेणखताचा वापर केल्यामुळे केळीचे दर्जेदार उत्पादन आले आहे. ‘लॅाकडाऊन’पूर्वी बाबर यांच्या शेतातील केळी उतरविण्यास सुरुवात झाली, त्यावेळी १० क्विंटल केळीला प्रतिक्विंटल १ हजार ३०० रुपये दर मिळाले. परंतु आता प्रतिक्विंटल ३०० ते ४०० रुपयापर्यंत कमी झाले आहेत. 

बुधवारपासून विक्री होणार सुरू 

सद्यस्थितीत व्यापाऱ्यांना कच्च्या केळीची विक्री केली, तर खुप मोठे नुकसान होईल. त्यामुळे बाबर यांनी पारंपरिक पध्दतीने केळी पिकविण्यासाठी भट्टी लावली. तसेच स्वतःच केळीची विक्री करण्याचा पर्याय स्विकारला. बुधवारी (ता.८) पिकलेली केळी विक्रीसाठी उपलब्ध होतील, असे बाबर यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com