Agriculture news in marathi, Further improvement in prices of brinjal, Guar and Okra in Solapur | Page 2 ||| Agrowon

सोलापुरात वांगी, गवार, भेंडीच्या दरांत आणखी सुधारणा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात वांगी, गवार, भेंडी, घेवड्याला पुन्हा एकदा उठाव मिळाला. साहजिकच, आवक कमी असल्याने त्यात आणखीनच भर पडली. या सप्ताहातही त्यांच्या दरात तेजी राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात वांगी, गवार, भेंडी, घेवड्याला पुन्हा एकदा उठाव मिळाला. साहजिकच, आवक कमी असल्याने त्यात आणखीनच भर पडली. या सप्ताहातही त्यांच्या दरात तेजी राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात वांग्याची ८ ते १० क्विंटल, गवारीची रोज २ ते ५ क्विंटल, भेंडीची १० ते १५ क्विंटल आणि घेवड्याची २ ते ३ क्विंटलपर्यंत आवक राहिली. गवार, भेंडी, घेवड्याची आवक स्थानिक भागांतूनच झाली. विशेषतः बार्शी, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर भागांतून ही आवक झाली. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने त्यांच्या  दरात आणि आवकेत सातत्याने चढउतार सुरू आहे. पण मागणी कायम असल्याने दर वधारलेलेच आहेत. 

या सप्ताहातही पुन्हा मागणी वाढली, पण आवक काहीशी कमी राहिल्याने दर तेजीत आणि टिकून राहिले. वांग्याला प्रतिक्विंटलला किमान १५०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ५५०० रुपये, गवारीला किमान १००० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ५००० रुपये दर मिळाला. भेंडीला किमान ५०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये, तर घेवड्याला किमान १५०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ४५०० रुपये असा दर मिळाला.  

टोमॅटो, ढोबळी मिरचीचे दर मात्र काहीसे स्थिर राहिले. त्यांची आवकही तशी २० ते ५० क्विंटल प्रतिदिन अशी जेमतेमच राहिली. टोमॅटोला प्रतिक्विंटल किमान १५० रुपये, सरासरी ५०० रुपये आणि सर्वाधिक १३०० रुपये, ढोबळी मिरचीला किमान ५०० रुपये, सरासरी ७०० रुपये आणि सर्वाधिक १००० रुपये असा दर मिळाला.

भाजीपाल्यामध्ये मेथी, शेपू आणि कोथिंबीर या भाज्यांच्या दरातही पुन्हा सुधारणा झाली नाही. भाज्यांच्या आवकेतही काहीसा चढउतार होता. त्यांची आवक ८ ते १० हजार पेंढ्यांपर्यंत राहिली. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी किमान ५०० ते ८०० रुपये, शेपूला ३०० ते ५०० रुपये आणि कोथिंबिरीला ४०० ते ६०० रुपये असा दर मिळाला.


इतर ताज्या घडामोडी
नगर : चारा उत्पादनाबाबत मिळतेय अंदाजे...नगर ः खरीप, रब्बी हंगामासह चारापिके, कुरण, जंगल...
कर्जमाफीची दुसरी यादी उद्यासोलापूर : महाविकास आघाडीने महात्मा जोतिराव फुले...
सातारा जिल्ह्यात अवघे ३२ टक्के कर्जवाटपसातारा ः जिल्ह्यातील कर्जमाफीत अडकलेल्या...
नाशिक विभागात पहिल्या टप्प्यात होणार ७१...नगर  ः राज्यात ५० कोटी वृक्षलागवडीचे...
खानदेशात कापसाची खेडा खरेदी मंदावलीजळगाव  ः खानदेशात कापसाची बाजारातील आवक कमी...
मुली, स्त्रियांमध्ये अजूनही...जळगाव  : मुली, स्त्रियांमध्ये अजूनही...
दोडामार्ग : साडेतीन हजार केळी झाडांचे...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यातील वीजघर, बांबर्डे (...
पवनारमधील शेती कसण्यासाठी करावा लागतोय...वर्धा  ः धाम नदीच्या दुसऱ्या बाजूस शेती...
व्यवस्थापन मसाला पिकांचे...मिरी वेल आणि जायफळास पुरेसे पाणी आणि खत...
उष्ण तापमानाचा केळी बागेवर परिणामउष्णलाटांमुळे बागेतील तापमान वाढते, आर्द्रता कमी...
लागवड पालेभाज्यांची....पाण्याची उपलब्धता असल्यास कमी कालावधीत...
वर्षभरात चार हंगामांत फायदा देणारा घेवडासातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात बहुतांशी उसाचे...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची १८७५ ते २८१०...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे विद्यापीठात पश्चिम विभागीय औषधी...पुणे  ः केंद्र सरकारच्या आयुष...
शिर्डीतील सामुदायिक विवाह सोहळ्यासाठीची...शिर्डी, जि. नगर  : साई सिद्धी चॅरिटेबल...
माळेगाव कारखान्यात सत्तापरिवर्तन;...माळेगाव, जि. पुणे  ः राज्यात लक्षवेधी...
नगर जिल्ह्यातील सहा केंद्रांवर तूर...नगर  ः जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीसाठी आठ...
कर्जमाफीवरून विरोधक दुसऱ्या दिवशीही...मुंबई  ः भाजपने शेतकरी कर्जमाफी आणि महिला...
सातारा जिल्ह्यात ९० टक्के क्षेत्रावर...सातारा  ः जिल्ह्यात पोषक वातावरणामुळे रब्बी...
मसाला, सुगंधी वनस्पतीवर्गीय पिकांची...अकोला  ः ‘‘आपल्याकडील हवामान, जमीन हे मसाला...