तूर, हरभरा चुकाऱ्यांवरून शेतकऱ्यांमध्ये रोष

तूर, हरभरा चुकाऱ्यांवरून शेतकऱ्यांमध्ये रोष
तूर, हरभरा चुकाऱ्यांवरून शेतकऱ्यांमध्ये रोष

अकोला : गेल्या हंगामातील तूर व हरभरा खरेदी करून तो गोदामात साठविला. मात्र अजूनही चुकारे मिळाले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले अाहेत. दुसरीकडे तुरीची खरेदी होऊ न शकलेल्या शेतकऱ्यांना शासनाने एक हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. परंतु, ही मदतदेखील मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष वाढत अाहे. यावरून शेतकऱ्यांबरोबरच आता विविध संघटनांनी अांदोलनांचे इशारे दिले आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मागील वर्षी खरेदी केंद्रावर तुरीची ऑनलाइन नोंदणी केली. परंतु शासनाकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे तूर घरात पडून राहिली. परिणामी नोंदणीधारक शेतकऱ्यांच्या तुरीला प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली.  काही महिन्यांनी तुरीचे अनुदान जमा झाले. मात्र, खरेदी केंद्रावर खरेदी-विक्री संघाने अनेक शेतकऱ्यांच्या चुकीच्या नोंदी केल्यामुळे त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला. या शेतकऱ्यांना तातडीने अनुदान द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून लढा देऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला अाहे. संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात मंगळवारी (ता.२७) संग्रामपूर येथे निवेदन देण्यात अाले.  

संग्रामपूर येथे देखील चुकीच्या नोंदीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. काही शेतकऱ्यांनी तुरीची नोंदणी केली. मात्र त्याठिकाणी उडदाच्या नोंदी झाल्याचे आढळून आले आहे. काही शेतकऱ्यांना प्रति क्विंटल हजार रुपये अनुदान मिळण्याऐवजी ते कमी मिळत आहे. चुकलेल्या नोंदी तत्काळ दुरुस्त करून शेतकऱ्यांना सातबारानुसार अनुदानाचा योग्य लाभ द्या, अशी मागणी रोशन देशमुख, जिल्हा सहसंपर्कप्रमुख मोहन पाटील, प्रशांत खोडे, श्रीकृष्ण बोरसे, संजय गावंडे, आशिष नांदोकार, नंदकिशोर बोडखे, गजानन आमझरे, योगेश वखारे, सुरेश रावणकार, प्रमोद मुरकर, बाबन वानखडे अादींनी केली.

अात्मदहनाच्या इशाऱ्यानंतर खात्यावर ७२ हजार जमा वारंवार पाठपुरावा करूनही चुकारे मिळत नसल्याने कानडी (ता. वाशीम) येथील मनोज भोयर या शेतकऱ्याने गुरुवारी (ता.२९) अात्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, त्याची दखल घेऊन प्रशासनाने त्याच्या हरभऱ्याचे ७२ हजार रुपये खात्यावर जमा केले. त्यामुळे भोयर यांनी आत्मदहनाचा इशारा मागे घेतला. इतरांच्या मागण्या मात्र तशाच आहेत.  अनसिंग येथील शेतकरी पांडुरंग ठाकरे यांनीही २५ क्विंटल हरभऱ्याची विक्री करूनही, नाफेडच्या गोदामात स्वीकारूनही त्याचे चुकारे मिळाले नाहीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com