पाणीपट्टी वसुलीअभावी म्हैसाळचे भवितव्य अधांतरी

पाणीपट्टी वसुलीअभावी म्हैसाळचे भवितव्य अधांतरी
पाणीपट्टी वसुलीअभावी म्हैसाळचे भवितव्य अधांतरी

सांगली ः म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू होऊन महिना झाला. पाणीपट्टी वसूल होत नसल्याने या योजनेचे भवितव्य धोक्‍यात आले आहे. योजनेची पाणीपट्टी वसूल झाली नाही, तर योजनेचे आवर्तन बंद करण्याची वेळ लवकरच येण्याची शक्‍यता आहे.

जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ, जत, तासगाव तालुक्‍यात पाणीटंचाई वाढू लागली. यामुळे ही योजना सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केल्याने योजना सुरू झाली. सुरवातीच्या काळात शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी लेखी स्वरुपात केली नसल्याने या योजनेचे पंप कमी सुरू केले होते. मात्र, दिवसेंदिवस पाणीटंचाई वाढू लागल्याने पंपाची संख्या वाढवली. वास्तविक पाहता जिल्ह्यात पाणीटंचाई असताना शेतकरी पाण्याची मागणी कसे करतील, असा प्रश्‍न उपस्थित होतोय.

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी जत तालुक्‍यात पोचले आहे. शेतीला पाणी मिळू लागले आहे. परंतु, हे पाणी केवळ मुख्य कालव्यातूनच शेतीला मिळतेय. पोटकालव्यातून शेती पाणी देण्यासाठी पाटबंधारे विभागाने हालचाली सुरू केल्या नसल्याचे दिसते आहे.

टंचाई निधीतून पाणीपट्टी घ्या जिल्ह्यात पावसाने दडी मारली. परिमाणी पिके वाया गेली आहेत. आमच्या शेतातून उत्पादन मिळाले नाही. त्यामुळे योजनेची पाणीपट्टी कशी भरायची, असा प्रश्‍न जत, कवठेमहांकाळ मिरज आणि तासगाव तालुक्‍यांतील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे शासनाने टंचाई निधीतून पाणीपट्टी भरावी, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

पाणीपट्टी वसुलीला प्रतिसाद नाहीच वास्तविक पाहता पाटबंधारे विभागात अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. पण ही योजना सुरू ठेवण्यासाठी योग्य नियोजन करत आहेत. अधिकारी पाणीपट्टी वसुलीसाठी गावोगावी फिरत आहेत. मात्र, आमच्याकडे पाणी आलेच नाही, असे सांगत शेतकरी पाणी पट्टी देण्याचे टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाणीपट्टीच्या थकबाकी वाढण्याची शक्‍यता आहे.

१९ टक्के रक्कम भरा शासनाने सिंचन योजनेची पाणीपट्टीचा सोपा मार्ग काढला आहे. पाणीपट्टीचा ८१ टक्के वाटा शासनाचा आहे. तर १९ टक्के वाटा शेतकऱ्यांचा आहे. असे असताना पाणीपट्टी वसूल होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची पाणीपट्टी वसुलीचा प्रश्‍न गंभीर होत चालला आहे. शेतकऱ्यांनी पाणी बिलाची १९ टक्के रक्कम भरली तरच ही योजना सुरळीत चालेल. अन्यथा योजनेचे अस्तित्व धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी १९ टक्के रक्कम भरा, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com