Agriculture news in marathi The future under black the 99 works of 'Jalyukt' in Ratnagiri district | Agrowon

रत्नागिरी जिल्ह्यात ‘जलयुक्त’मधील ९९ कामांचे भवितव्य अधांतरी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 जानेवारी 2020

रत्नागिरी : भाजप सरकारच्या कालावधीत सुरू झालेले जलयुक्त शिवार अभियान गुंडाळण्याची शक्यता आहे. या योजनेतील पूर्ण झालेल्या कामांसाठीची बिले देण्यास निधी उपलब्ध नसल्याने ठेकेदारांना फटका बसण्याची भीती आहे. या आराखड्यातील ९९ कामे अपूर्ण असून त्यांचे भवितव्य अधांतरी आहे. 

रत्नागिरी : भाजप सरकारच्या कालावधीत सुरू झालेले जलयुक्त शिवार अभियान गुंडाळण्याची शक्यता आहे. या योजनेतील पूर्ण झालेल्या कामांसाठीची बिले देण्यास निधी उपलब्ध नसल्याने ठेकेदारांना फटका बसण्याची भीती आहे. या आराखड्यातील ९९ कामे अपूर्ण असून त्यांचे भवितव्य अधांतरी आहे. 

जलयुक्त शिवार अभियानातील तिसऱ्या टप्प्यात १,१९६ कामांना मंजूरी देण्यात आली. त्यातील ३ कामे रद्द केली. चौथ्या टप्याचा आराखडा सप्टेंबर २०१८ मध्ये करण्यात आला. निविदा काढण्यासाठी उशिर झाल्यामुळे कामे लांबली. त्यातील प्रस्तावित ६८५ कामांसाठी १० कोटी ७६ लाख ४९ हजार रूपयांच्या आराखड्याला मान्यता मिळाली होती. ३२३ कामे जलसंधारणाची, तर ३६२ कामे फळबाग लागवडीची आहेत. त्यापैकी ५८६ कामे पूर्ण करण्यात आली. ९९ कामे अद्याप शिल्लक आहेत.

चौथ्या टप्प्यातील कामे अंतिम टप्यात असतानाच डिसेंबरपर्यत कामे पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. जलयुक्त शिवार योजना गुंडाळण्यात आल्याने रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी शासकीय यंत्रणेची लगबग सुरू असतानाच आता निधीचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

सर्वाधिक कामे कृषी विभागाकडील रखडली आहेत. कृषी विभागाकडील ३७४ कामे पूर्ण झाली आहेत. २९ कामे सुरू असून ६५ कामे अद्याप प्रलंबित आहेत. ग्रामपंचायत पाणी पुरवठा विभागाकडील १२ कामे पूर्ण झाली असून ६० कामे सुरू आहेत. सामाजिक वनीकरणकडील ५ कामे अद्याप शिल्लक आहेत. 

शासनाकडे निधीची मागणी 

विविध यंत्रणेकडील एकूण ४४७ कामांची पूर्ण झाली असून ३ कोटी १७ लाख ७८ हजार रूपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. कृषी विभागाकडील २९ कामे, सामाजिक वनीकरण विभागाकडील ५०, जिल्हा परिषदेच्या गरामपंचायत पाणी पुरवठा विभागाकडील ६० मिणून १३९ कामे सुरू होती. ही सर्व कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. एकूणच ठेकेदारांकडून झालेल्या विलंबामुणे कामे रखडली असली तरी प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आता निधीचा प्रश्न उद्भवणार असून त्यासाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. 


इतर ताज्या घडामोडी
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...
पुण्यात कृषी आयटीआय संस्था सुरू करणार...पुणे : कृषी, सहकार, उद्योग विभागाला चालना...
मराठवाड्यातील पाणीप्रश्नाबाबत...औरंगाबाद  : कुणावर आक्षेप घेण्यासाठी नव्हे;...
पद्मश्री जाहीर होताच हिवरेबाजारमध्ये...नगर ः आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे...
हिवाळी हंगामात पौष्टिक चाऱ्यासाठी करा...बरसीम (शास्त्रीय नावः ट्रायफोलियम...
नगरमध्ये गवार, लसणाच्या दरांत सुधारणा...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण,...
सोलापुरात हिरवी मिरची, वांगी,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...