Agriculture news in Marathi, in future we in government action on Immediate debt waiver : Sharad Pawar | Agrowon

आघाडीचे सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी ः शरद पवार
टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

जालना : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्जाचा डोंगर वाढल्यामुळे महाराष्ट्रात सुमारे सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले आहे. आघाडीचे सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी देणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. जालना येथे शुक्रवारी (ता. २०) आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. 

या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, आमदार राजेश टोपे, माजी खासदार पुंडलिक हरी दानवे, माजी आमदार अरविंद चव्हाण, चंद्रकांत दानवे, विजय बोराडे, डॉ. निसार देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

जालना : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्जाचा डोंगर वाढल्यामुळे महाराष्ट्रात सुमारे सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले आहे. आघाडीचे सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी देणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. जालना येथे शुक्रवारी (ता. २०) आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. 

या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, आमदार राजेश टोपे, माजी खासदार पुंडलिक हरी दानवे, माजी आमदार अरविंद चव्हाण, चंद्रकांत दानवे, विजय बोराडे, डॉ. निसार देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे श्री. पवार म्हणाले, की जगाचा पोशिंदा असलेला बळिराजा संकटात सापडला आहे. सरकारने उद्योगपतींसाठी बँकेत ८८ हजार कोटींचा भरणा केला आहे. परंतु शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. देशातील अनेक उद्योग बंद पडल्याने बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. महाभरतीचे अामिष दाखवून युवकांची फसवणूक केली जात आहे. तूर्तास युवक शांत आहे यांच्या भावनेचा उद्रेक झाल्यास हे सरकारचे अस्तित्व राहणार नाही. 

भाजपमध्ये जाणाऱ्या गयारामावर टीका करताना ते म्हणाले, की पंधरा वर्षे मंत्री असताना तुम्ही कोणाचा विकास केला? पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पुराने थैमान घातले असताना मुख्यमंत्री मात्र महाजनादेश यात्रेत मग्न आहे. सरकार असंवेदनशील असल्याचे श्री. पवार म्हणाले. महाराष्ट्रातील गडकिल्ले शौर्याचं प्रतीक आहे. या किल्ल्यांवरून छमछमचा इतिहास सांगणार आहात का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

या वेळी धनंजय मुंढे यांनी भाजप-शिवसेनेवर सडकून टीका केली. शरद पवार यांनी आजपर्यंत सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले. महिलांना आरक्षण दिले. शेतकऱ्यांना ७२ हजार कोटींची कर्जमाफी दिली. तरीही गुजरातमधील काही लोक येऊन म्हणतात महाराष्ट्रासाठी काय काम केले. ही सर्वांसाठी खेदाची बाब आहे. जोपर्यंत युवक त्यांच्या सोबत आहे तो पर्यंत पुरोगामी विचार कोणीही संपवू शकणार नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन मुंढे यांनी केले. कार्यकर्ता मेळाव्यात राजेश टोपे, अरविंद चव्हाण आदींनी मार्गदर्शन केले.

इतर ताज्या घडामोडी
सातारा जिल्ह्यात सोयाबीन काढणीत पावसाचा...सातारा ः जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सध्या सुरू...
मराठवाडी धरणावर पुन्हा यंत्रणा सज्जढेबेवाडी, जि. सातारा ः पावसाळ्यात थांबविलेले...
परभणीत अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची...परभणी ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या...
स्वाभिमानीच्या विदर्भ अध्यक्षांवरील...अमरावती ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ...
सततच्या पावसाने नगर जिल्ह्यात पिकांचे...नगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पडत...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस; भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
खाद्यउद्योगासाठी जंगली बुरशींचे...क्विण्वनयुक्त पदार्थांच्या चवीमध्ये त्यामध्ये...
पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील...नाशिक   : जिल्ह्यात द्राक्ष हंगामाला...
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
फलटण तालुक्यात द्राक्षांचे घट फुटले;...सातारा  : फलटण तालुक्यातील निरगुडी, गिरवी,...
रसायनांच्या परिणामकारकतेसाठी नोझल,...तणनाशकाचे गुणधर्म असलेला एखादा क्रियाशील घटक...
जळगावात आले २८०० ते ५२०० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
वऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...
सोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...