हरभरा, सोयाबीन वगळता सर्व पिकांच्या फ्यूचर्स किमतींत वाढ

वायदेबाजार आलेख
वायदेबाजार आलेख

खरीप पिकाच्या उत्पादनात जरी घट अपेक्षित असली तरी रब्बी उत्पादन चांगले येईल, अशी अपेक्षा आहे. १६ जानेवारीपर्यंत जवळपास सर्वच प्रमुख पिकांसाठी मागील वर्षाच्या (२०१८-१९) तुलनेने या वर्षी (२०१९-२०) अधिक क्षेत्र लागवडीखाली आले आहे. गतवर्षी एकूण रब्बी पिकांखाली ५९१ लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली होते; ते या वर्षी ६४१ लाख हेक्टरपर्यंत गेले आहे. आत्तापर्यंत हवामान अनुकूल असल्याने या वर्षी रब्बी पीक विक्रमी होण्याची शक्यता आहे. जागतिक पुरवठ्यातही वाढीचा अंदाज अमेरिकन कृषी खात्याने दिला आहे. या व एकूणच मंदीच्या पार्श्वभूमीवर या सप्ताहात भात सोडून सर्व पिकांचे दर मोठ्या प्रमाणात घसरले. गव्हात ही घसरण सर्वात अधिक (७.५ टक्के) होती. त्याखालोखाल मका (४.७ टक्के) व हरभरा (४.५ टक्के) यांच्या किमती घसरल्या. (आलेख १). मात्र सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने हरभरा व सोयाबीन वगळता सर्व पिकांच्या एप्रिल/मे फ्यूचर्स किमतींत वाढ दिसून येत आहे (आलेख २). गेल्या सप्ताहातील NCDEX व MCX मधील किमतीतील चढउतार मका (खरीप) खरीप मक्यामध्ये अजून व्यवहार होत नाहीत. मक्याच्या (फेब्रुवारी २०२०) किमती २४ डिसेंबरपर्यंत वाढत होत्या. (रु. १,९८९ ते रु. २,१३८). नंतर त्या उतरत गेल्या. या सप्ताहात त्या ४.७ टक्क्यांनी घसरून रु. १,९६६ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (सांगली) ४.६ टक्क्यांनी घसरून रु. १,९५७ वर आल्या आहेत. या वर्षीचा हमी भाव रु. १,७६० आहे. सोयाबीन सोयाबीन फ्यूचर्स (फेब्रुवारी २०२०) किमती डिसेंबर महिन्यात वाढत होत्या. (रु. ४,१५६ ते रु. ४,४७८). या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी घसरून रु. ४,२१८ वर आल्या. स्पॉट (इंदूर) किमती रु.४,३६३ वर आल्या आहेत. नवीन वर्षासाठी हमी भाव रु. ३,७१० आहे. एप्रिल डिलिव्हरीसाठी रु. ४,२३६ भाव आहे. हळद हळदीच्या फ्यूचर्स (मार्च २०२०) किमती डिसेंबर मध्ये वाढत होत्या. (रु. ५,८७८ ते रु. ६,६१८). गेल्या सप्ताहात त्या ०.७ टक्क्यांनी घसरून रु. ६,४०४ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २.२ टक्क्यांनी घसरून रु. ६,२१४ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,०७८ वर आल्या आहेत. मे महिन्यातील फ्यूचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.२ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ६,२१२) गहू गव्हाच्या (फेब्रुवारी २०२०) किमती डिसेंबरमध्ये वाढत होत्या. (रु. २,१४९ ते रु. २,२३५). या सप्ताहात त्या ७.५ टक्क्यांनी घसरून रु. २,१३५ वर आल्या आहेत. स्पॉट (कोटा) किमती रु. २,१८१ वर आल्या आहेत. एप्रिलच्या फ्यूचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा १.४ टक्क्यांनी अधिक आहेत. (रु. २,२११). या वर्षीचा हमी भाव रु. १,९२५ आहे. गवार बी गवार बीच्या फ्यूचर्स (फेब्रुवारी २०२०) किमती १० डिसेंबर पासून वाढत होत्या. (रु. ३,९८८ ते रु. ४,३१२). या सप्ताहात त्या १.७ टक्क्यांनी घसरून रु. ४,१०६ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु.४,०३५ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा एप्रिलमधील फ्यूचर्स किमती ३.९ टक्क्यांनी अधिक आहेत. (रु. ४,१९४). हरभरा हरभऱ्याच्या फ्यूचर्स (मार्च २०२०) किमती ११ डिसेंबरनंतर वाढत होत्या. (रु. ४,२९४ ते रु. ४,५१४). गेल्या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी घसरून रु.४,३६० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ४.५ टक्क्यांनी घसरून रु.४,१६४ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,२२८ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा मे मधील फ्यूचर्स किमती १.७ टक्क्यांनी कमी आहेत. (रु. ४,१५५). हमी भाव रु.४,८७५ आहे. कापूस

एमसीएक्समधील कापसाच्या फ्यूचर्स (फेब्रुवारी २०२०) किमती डिसेंबरमध्ये वाढत होत्या. (रु. १९,३२० ते रु. १९,८४०). या सप्ताहात १.८ टक्क्यांनी घसरून त्या रु. १९,८६० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १९,४०० वर आल्या आहेत. एप्रिलच्या फ्यूचर्स किमती रु.२०,३३० वर आहेत. त्या सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ४.८ टक्क्यांनी अधिक आहेत. मूग मुगांत अजून व्यवहार होत नाहीत. मात्र, भावात तेजी होती. ती या सप्ताहात रोखली गेली. स्पॉट (मेरता) किमती २.४ टक्क्यांनी घसरून रु. ७,७११ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती रु.७,८१७ वर आल्या आहेत. मुगाचे हमी भाव रु. ७,०५० आहेत. बासमती भात (धान) बासमती भातामध्येही अजून व्यवहार होत नाहीत. स्पॉट (कर्नाल) किमती १.६ टक्क्यांनी वाढून रु.३,२०० वर आल्या आहेत. बाजरी बाजरीमध्ये गेल्या महिन्यापासून ट्रेडिंग सुरू झाले आहे. मात्र अजून व्यवहार सुरु झाले नाहीत. स्पॉट (जयपूर) किमती १.७ टक्क्यांनी घसरून रु. १,९५७ वर आल्या आहेत. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी). arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com