गडचिरोलीतील १२६९ गावांची सरासरी पैसेवारी ६२ पैसे

गडचिरोलीतील १२६९ गावांची सरासरी पैसेवारी ६२ पैसे
गडचिरोलीतील १२६९ गावांची सरासरी पैसेवारी ६२ पैसे

गडचिरोली : तांत्रिक कारणामुळे जिल्ह्याची अंतिम पैसेवारी उशिरा जाहीर करण्यात आली. ती सरासरी ६२ पैसे इतकी आली. त्यानुसार जिल्ह्यातील १२६९ गावांत दुष्काळ नाही. शासनाद्वारे अवघ्या २०८ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत काढण्यात आली आहे. 

या वर्षीची अंतिम पैसेवारी ३१ डिसेंबरपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले होते. परंतु काही तालुक्‍यांची माहिती येणे बाकी असल्यामुळे जिल्ह्याची पैसेवारी काढण्यास विलंब लागला. जिल्ह्यातील एकूण १६८८ गावांपैकी खरीप पिकाची १५३९ गावे आहेत. त्यापैकी पीक नसलेली गावे ६२ आहेत. एकूण लागवडीखाली असलेल्या १ लाख ८८ हजार ५४८.५७ हेक्‍टर क्षेत्रापैकी यंदा एक लाख ७२ हजार ५०८.७९ हेक्‍टरवर खरीप पिकांची लागवड झाली. विशेष म्हणजे राज्य शासनाने दुष्काळ घोषित केलेल्या १५१ तालुके व २६८ महसूल मंडळांत जिल्ह्यातील एकाही गावाचा समावेश नाही. 

अंतिम पैसेवारीनुसार यंदा अहेरी तालुक्‍यातील सर्व ११८ गावांतील पैसेवारी ४६ आली. भामरागड तालुक्‍यातील ९० गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत, तर १६ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आहे. सिरोंचा तालुक्‍याची पैसेवारी सर्वाधिक म्हणजे ६८ पैसे आली. 

अशी आहे पैसेवारी

तालुका   गावे (संख्या  पैसेवारी
गडचिरोली १२६     ०.६५
धानोरा  २२२ ०.६६
चामोर्शी  १९१ ०.६६ 
मुलचेरा ५९ ०.६५
देसाईगंज  ३८ ०.६४ 
आरमोरी  ९७ ०.५७ 
कुरखेडा १२३ ०.५५
कोरची  १२७ ०.६४
अहेरी   ११८ ०.४६ 
एटापल्ली १९४ ०.५६ 
भामगरागड १०६ ०.४८ 
सिरोंचा  ७६ ०.६८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com