गडहिंग्लजमध्ये ज्वारीचे क्षेत्र एक हजार हेक्‍टरने घटले

In Gadhinglaj, sorghum area decreased by one thousand hectares
In Gadhinglaj, sorghum area decreased by one thousand hectares

गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे गडहिंग्लज तालुक्यातील जमिनींमध्ये वेळेत वाफसा न आल्याच्या कारणामुळे यंदा रब्बी पिकांचे क्षेत्र घटले आहे. ज्वारी, गहू, हरभरा, मक्का या प्रमुख पिकांच्या क्षेत्रातील घट चिंताजनक आहे. त्यातही ज्वारीचे क्षेत्र ११३३ हेक्‍टरने घटले आहे. खरीप पिकांचे झालेल्या नुकसानीच्या पार्श्‍वभूमीवर रब्बी पीकही घेता न आल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

शेतकऱ्यांना यंदाचे वर्ष नैसर्गिक संकटाचे गेले आहे. प्रचंड पावसामुळे ऑगस्टमध्ये आलेल्या महापुराने नदीकाठची पिके हातची गेली. इतर ठिकाणच्या पिकांपासून अतिवृष्टीमुळे समाधानकारक उत्पन्न मिळाले नाही. सोयाबीन, भात काढणीच्या वेळी अवकाळी पावसाच्या रूपाने पुन्हा शेतकऱ्यांसमोर संकट उभारले. अशा अनंत अडचणीतून मार्ग काढत शेतकरी बाहेर पडला. रब्बी हंगामातून काही तरी पदरात पडेल, अशी आशा धरून जगणाऱ्या शेतकऱ्याला या हंगामाकडूनही दगा मिळण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

मुळात रब्बी हंगामातील पेरण्या सप्टेंबर-ऑक्‍टोबर महिन्यात होतात. हा रब्बीसाठी चांगला कालावधी आहे, असे संबोधले जाते. गहूची पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत चालते. यंदा मॉन्सून उशिरा माघारी गेला. 

ऑक्‍टोबरपर्यंत अवकाळी पाऊस कायम राहिला. यामुळे शेतकऱ्यांना रब्बीपूर्व मशागतीसाठी वेळच मिळाली नाही. शेतात गुडघाभर तण वाढले होते. सोयाबीन कापणीवेळी या तणाचा मोठा त्रास झाला. जमिनीत घात नसल्याने हे तण काढण्यासही उशिर झाला. ओल असल्याने नांगरट झाली नाही. अजूनही काही जमिनींमध्ये ओल कायम आहे. उसाच्या तोडीत अजूनही शेतवडीत वाहने जात नाहीत. अशा परिस्थितीत हजारो हेक्‍टर क्षेत्र रिकामे राहिले आहे.

तीन ऐवजी यंदा बहुतांश शेतकऱ्यांना दोनच पिके हाताला लागणार आहेत. यातील एक खरिपाचे पीक वायाच गेले आहे. त्यातच आता रब्बी हंगामातील पेरण्याही उशीर झाल्याने शेती पड राहिली आहे. यामुळे रब्बी पिकाखालील क्षेत्रात मोठी घट झाली आहे. माळरानातील जमिनीत गहू, ज्वारी, मक्का, हरभरा आदी पिकांची पेरणी झाली आहे. त्यातही ज्वारी व हरभरा या पिकांचीच बऱ्यापैकी पेरणी झाली आहे. काळवट जमिनीतील पेरण्या खोळंबल्या आहेत. आता त्या होणेही शक्‍य नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com