‘मी शेतकरी’ आंदोलनाला गांधी जयंतीपासून सुरवात

‘मी शेतकरी’ आंदोलनाला गांधी जयंतीपासून सुरवात
‘मी शेतकरी’ आंदोलनाला गांधी जयंतीपासून सुरवात

नगर : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव तसेच सरसकट कर्जमाफीसाठी विविध शेतकरी संघटना आणि किसान सभेतर्फे ‘मी शेतकरी’ आंदोलनाला गांधी जयंतीपासून सुरवात करण्यात येत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावांत होणाऱ्या सभांमध्ये ‘मी शेतकरी’ असलेल्या टोप्या घालून शेतकरी सहभागी होतील आणि भाषण देणाऱ्या पुढाऱ्यांना ही जाब विचारला जाणार आहे, अशी माहिती किसान सभेचे सरचिटणीस अजित नवले यांनी दिली.

नवले म्हणाले, की एकीकडे दुष्काळ, महापूर आणि दुसरीकडे फसव्या कर्जमाफीने शेतकरी त्रस्त झालेला आहे. या पार्श्वभूमीवर विविध शेतकरी संघटना व कार्यकर्ते यांनी जाब विचारण्यासाठी ‘मी शेतकरी’ या झेंड्याखाली एकत्र येऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार मराठवाड्यातील काही गावांत हे आंदोलन सुरूही झालेले आहे. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईत किसान सभा आणि शेतकरी संघटनांची बैठक झाली. 

या बैठकीत या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार गांधी जयंतीदिनी दोन ऑक्टोबर रोजी गावाच्या पारावर शेतकरी धरणे आंदोलन करतील. तसेच, शेतकरी परिषद होईल. सरसकट कर्जमाफी याविषयी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा घेऊन ठराव करून ते राज्यपालाकडे पाठवले जाणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com