हुकूमशाहीला गांधीजींच्या अहिंसेने उत्तर देऊ ः शरद पवार

Gandhi's non-violence will answer the dictatorship ः Sharad Pawar
Gandhi's non-violence will answer the dictatorship ः Sharad Pawar

मुंबई : सरकार हुकूमशाही नीती वापरत आहे. जेएनयूमध्ये जे झाले ते योग्य नव्हते. त्यामुळे संपूर्ण देशात विरोध होत आहे. सरकारच्या हुकूमशाहीला गांधीजींच्या अहिंसा तत्त्वाने उत्तर द्यायला हवे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी महात्मा गांधी शांतीयात्रेला हिरवा कंदील दाखवताना व्यक्त केले.

माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी महात्मा गांधी शांतीयात्रेचे गुरुवारी गेट वे ऑफ इंडिया येथून आयोजन केले होते. ही यात्रा ३१ जानेवारीला दिल्लीतील राजघाटावर पोचणार आहे. या गांधी शांतीयात्रेला शरद पवार यांनी हिरवा कंदील दाखवला. 

नागरिकत्व कायदा आणि नागरिक नोंदणीबाबत देशातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कागदपत्रे नसतील तर लोकांना भीती आहे, की सरकारकडून त्यांना सरकारने निर्माण केलेल्या छावण्यांमध्ये राहावे लागेल, अशी परिस्थिती सरकारने निर्माण केली आहे. देशात आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे देशातील जनता सरकारवर नाराज आहे. या कारणामुळे मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरत आहेत. त्यांना चांगला रस्ता दाखवण्याची गरज आहे आणि त्यासाठी महात्मा गांधीजींचा अहिंसा तत्त्वाचा मार्ग असून, यामुळे संविधान वाचवू शकतो, असेही श्री. पवार म्हणाले. 

या शांतीयात्रेला माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार विद्याताई चव्हाण आणि कार्यकर्ते, मुंबईकर उपस्थित होते. 

‘मंत्र्यांनी समन्वय ठेवून काम करावे’ राज्यात तीन पक्षांचे मिळून संयुक्त सरकार असल्याने मंत्र्यांनी आपापसात समन्वय ठेवून जबाबदारीने काम करावे, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी (ता. ८) पक्षाच्या मंत्र्यांना केली. आपल्या मतदारसंघातील मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांशी राजकारण करू नका. विकासकामे करताना त्यांना विश्वासात घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला. राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाल्यानंतर श्री. पवार यांनी पहिल्यांदाच पक्षाच्या मंत्र्यांची बैठक घेतली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com