‘कडकनाथ’ घोटाळाप्रकरणी गणेश शेवाळे यांस अटक

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सांगली  ः कडकनाथ कोंबडी घोटाळाप्रकरणी गणेश शेवाळे यांना मंगळवारी (ता. २४) रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. शेवाळेंसह संदीप मोहिते, हणमंत जगदाळे यांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित पाच जणांना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी दिली.

इस्लामपुरातून नियंत्रित झालेला कडकनाथ घोटाळा कोट्यवधी रुपयांचा आहे. व्यवसायात गुंतवणूक केलेल्या हजारो शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. लाखो रुपयांची गुंतवणूक करून आता त्यांच्यावर संकट कोसळले आहे. शेतीला पूरक व्यवसाय करण्याचा विचार करत तरुणांनी यात पैसे गुंतवले होते. फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर तक्रारींचा ओघ सुरू झाला. त्यानंतर महा रयत ॲग्रो कंपनीचे संस्थापक सुधीर मोहिते, संदीप मोहिते, गणेश शेवाळे, विनय शेंडे, हणमंत जगदाळे यांच्या विरोधात इस्लामपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, अधीक्षक श्री. शर्मा म्हणाले, की ‘कडकनाथ’ घोटाळाप्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर २८८८ तक्रारी अर्ज प्राप्त झाले. गुन्ह्याची व्याप्ती पाहता सदरचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. संशयित तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांची बॅंक खाती गोठविण्यात आली आहेत. तसेच ठेवीदार फसवणूक संरक्षण कायद्यानुसारही चौकशी केली जात आहे. सदर गुन्ह्यात फॉरेन्सिक ऑडिट केले जाणार आहे. सद्यःस्थितीत आलेल्या तक्रारी अर्जांची तपासणी करून संबंधितांकडे चौकशी केली जात आहे. 

प्राथमिक तपासात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती पाहता तपास मिरजचे पोलिस उपाधीक्षक संदीपसिंह गिल यांच्याकडे देण्यात आला आहे. ते आयपीएस आहेत. दररोज याबाबतचा आढावा त्यांच्याकडून घेतला जातो. तसेच तंत्रिक माहितीच्या आधारेही तपास केला जात असल्याचे  शर्मा यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com