सिंधुदुर्ग, रत्नागिरीत गणेशोत्सवास उत्साहात प्रारंभ

सिंधुदुर्ग, रत्नागिरीत गणेशोत्सवास उत्साहात प्रारंभ
सिंधुदुर्ग, रत्नागिरीत गणेशोत्सवास उत्साहात प्रारंभ

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात सर्वात मोठा उत्सव असलेल्या गणेशोत्सवास सोमवारी (ता.२) मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. जिल्ह्यात ६८ हजार ३१३ घरगुती; तर ३४ सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या उत्सवाला मुंबईतून लाखो चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण उत्साही बनले आहे. 

कोकणात सर्वांत मोठा सण म्हणून गणेशोत्सवाकडे पाहिले जाते. या उत्सवाकरिता लाखो गणेशभक्त कोकणात दाखल होतात. त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण पूर्णतः बदलून जाते. या उत्सवामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणालादेखील मोठा फायदा होतो. मोठ्या उत्साहाने घरोघरी आणि सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. त्यामुळे पुढील ११ दिवस जिल्ह्यातील वातावरण बाप्पामय राहणार आहे.

जिल्ह्यात दीड, पाच, सात आणि ११ दिवस गणपतीचे पूजन करण्याची पद्धत आहे. काही सार्वजनिक मंडळांचा अपवाद वगळता इतर सर्वच गणपतीचे अनंत चतुर्थीदशीला विसर्जन केले जाते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्याचे चित्र आहे.

वरुण राजाच्या अभिषेकात गणरायाचे आगमन कोकणात पारंपरिक पद्धतीने गावागावांतील गणेशाचे आगमन वरुणराजाच्या अभिषेकात झाले. जिल्ह्यात १ लाख ६६ हजार ५८७ खासगी, तर ११० सार्वजनिक ठिकाणी बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली. घराघरांमध्ये ‘तू सुखकर्ता, तू दुखहर्ता’चे सुर घुमू लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे सोमवारी गावागावांमध्ये गणेशमूर्ती लवकर घरी आणण्याची लगबग सुरू होती. सकाळी ७ वाजल्यापासून गणेशमूर्ती घरी नेण्यासाठी कसरत सुरू होती.

पावसापासून वाचवत अनेक गणेशभक्तांनी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढल्या. सकाळपासून हलक्या सरी पडत राहिल्या. ग्रामीण भागात सकाळी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com