नाशिक महापालिकेसाठी 'गंगापूर'चे पाणी आरक्षित

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाशिक : नाशिक महापालिकेने केलेल्या वाढीव पाणी आरक्षणाची मागणी अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावत महापालिकेला गंगापूर धरणातून ३९००, तर दारणातून ४०० दलघफू पाणी आरक्षणास मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे विविध यंत्रणांसाठी मागणीनुसार ५ ते १० टक्के वाढीव आरक्षण देत २६ प्रकल्पांतील १३ हजार ९०० दलघफू पाणी आरक्षण मंजूर करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये आजमितीस ५९ हजार २९१ दलघफू पाणीसाठा आहे. यात गंगापूर धरण समूहात ९६ टक्के, पालखेड समूहात ९९ टक्के, तर गिरणा खोऱ्यात ९९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. १५ ऑक्टोबर रोजीचा धरण प्रकल्पातील साठा विचारात घेऊन पुढील वर्षीचे पाणी आरक्षण केले जाते.

त्यानुसार नळपाणी पुरवठा योजना, औद्योगिक संस्था, सिंचन व बिगर सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले होते. मात्र महापालिकेने ४६०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी केल्याने या प्रस्तावास प्रशासन आणि पाटबंधारे विभागाने असहमती दर्शवली. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी आरक्षणाची मागणी नोंदवावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला सूचित केले.

गेल्यावर्षी महापालिकेने गंगापूरमधून ४२०० दलघफू, तर दारणातून ३०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी केली होती. परंतु जलसंपदा खात्याने गंगापूरमधून ३९००, तर दारणातून ४०० दलघफू पाणी आरक्षणाला मान्यता दिली होती. यंदा मात्र महापालिकेने गंगापूरमधून ४३०० तर दारणातून ३०० दलघफू पणी आरक्षणाची मागणी केली. त्यात गंगापूरमधून ४३००, तर दारणातून ३०० दलघफू, असे ४६०० दलघफू पाणी घ्यावे, असा प्रस्ताव देण्यात आला.

मात्र मनपाने दारणातून तितक्या क्षमतेने पाणी उचलण्यात असमर्थता दर्शवली आहे. प्रशासन आणि पाटबंधारे खात्याच्या मते महापालिकेला वाढीव पाण्यासाठी दर्शवलेल्या कारणांचा अभ्यास करता ४६०० दलघफू इतके पाणी लागू शकत नाही. त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच गंगापूरमधून ३९००, तर दारणातून ४०० दलघफू पाणी आरक्षणास जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com