agriculture news in Marathi, gap after a week good rain possibilities, Maharashtra | Agrowon

आठवडाभराच्या खंडानंतर पुन्हा चांगला पाऊस : हवामान विभाग
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 25 जून 2019

पुणे: राज्याच्या बहुतांशी भागात मॉन्सूनचे आगमन झाले आहे. लवकरच मॉन्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल. बुधवारपासून (ता. २६) मॉन्सूनचे प्रवाह सौम्य होणार असल्याने पावसात आठवडाभर खंड पडणार आहे. मात्र, कोकणात अनेक ठिकाणी जोरदार, तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. आठ ते दहा दिवसांच्या खंडानंतर पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता असल्याचे पुणे हवामान विभाग प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले. 

पुणे: राज्याच्या बहुतांशी भागात मॉन्सूनचे आगमन झाले आहे. लवकरच मॉन्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल. बुधवारपासून (ता. २६) मॉन्सूनचे प्रवाह सौम्य होणार असल्याने पावसात आठवडाभर खंड पडणार आहे. मात्र, कोकणात अनेक ठिकाणी जोरदार, तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. आठ ते दहा दिवसांच्या खंडानंतर पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता असल्याचे पुणे हवामान विभाग प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले. 

बुधवारनंतर (ता. २६) राज्यात पावसात परत एकदा खंड आढळून येईल, जो किमान आठवडाभर तरी राहणार असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पावसात पडणाऱ्या खंडाच्या पार्श्वभमीवर जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये आणि २६ नंतर पावसात पडणाऱ्या खंडाच्या अंदाजानुसारच पेरणी संबंधी निर्णय घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

पावसातील खंडाबाबत बोलताना डॉ. कश्यपी म्हणाले, मॉन्सूनच्या पावसामध्ये टप्पे असतात. यात मॉन्सूनचे प्रवाह सक्रीय, कमजोर होत राहतात. त्यामुळे काही दिवस पाऊस, नंतर खंड आणि पुन्हा पाऊस अशा स्वरूपात हा पर्जन्यमान असते. यंदा मॉन्सून जवळपास १५ दिवस उशिराने आला आहे. दोन दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते.

त्यामुळे मॉन्सून सक्रीय होऊन राज्यात पाऊस पडू लागला. २६ जून पर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस पडेल. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होईल, तर कोकणात पाऊस सुरूच राहील. सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील पर्जन्य छायेच्या प्रदेशातही कमी अधिक पाऊस पडत राहील. उर्वरित भागात पावसाचे प्रमाण कमी होईल. 

कमी कालावधीची पिके घ्यावीत
मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी न कोसळल्याने राज्यात जमीन पूर्णपणे कोरडी झाली आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाने ती भिजून जाईल. मात्र जेथे पाऊस कमी आहे, तेथे सिंचनाची सुविधा असेल तरच पेरणी करावी. ‘वायू’ वादळामुळे झालेल्या पावसाने कोकणात जमीन यापूर्वीच भिजली आहे. यापुढे तेथे पाऊस सुरू राहणार असून, शेतकऱ्यांनी पेरणी करावी. इतर विभागात सिंचनाची सुविधा असेल, तरच पेरणी करावी, अन्यथा चांगला पाऊस होईपर्यंत थांबावे. पिके घेताना कमी कालावधीची साधारणत: ९० ते १०० दिवसांची पिके घ्यावीत. 

इतर अॅग्रो विशेष
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...
‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...
चिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...
ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...
पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...
कमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
मराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...
मराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...
मराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...
।। जातो माघारी पंढरीनाथा । तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...