Agriculture news in marathi Garden destroyed in Dapoli, Mandangad | Agrowon

दापोली, मंडणगडमध्ये बागांना फटका

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 जून 2020

नुकसान न भरून निघणारे आहे. पुढील पाच वर्ष याचा आर्थिक फटका सहन करावा लागेल. दहा वर्षांपूर्वीच्या वादळापेक्षाही याचा परिणाम अधिक आहे. 
- नरेंद्र बर्वे, शेतकरी. 
 

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा दापोली, मंडणगड तालुक्यांना बसला आहे. वेगवान वाऱ्यामुळे आंबा, नारळी, पोफळीच्या बागा उध्वस्त झाल्या. तर, घरांची छते उडून गेली. शंभरहून अधिक गावे बाधित झाली असून नुकसानीचा आकडा कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. 

गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरारसरी पाऊस ९३.४४ मिलीमीटर झाला. त्यात मंडणगड १३०, दापोली १२५, खेड ७६, गुहागर ७७, चिपळूण १०२, संगमेश्वर ७३, रत्नागिरी ४०, लांजा १३१, तर राजापुरात ८७ मिमीची नोंद आहे. निसर्ग वादळाचा प्रभाव सायंकाळपर्यंत होता. वादळाचे केंद्रबिंदू अलिबाग असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक वादळाचा फटका मंडणगड, दापोली, गुहागर या तालुक्यांना बसला. 

एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे घरावरची कौले, पत्रे कागदासारखी उडून जमीनिवर कोसळत होती. छतच राहिले नाही. त्यामुळे मिळेल तिथे आधार घेत कुटुंबांतील ही मंडळी उघड्या डोळ्यांनी झालेले नुकसान पाहत होती. पावसाचे पाणी घरातील मांडलेला संसार उध्वस्त करत होते. हे चित्र या तीन तालुक्यांत सर्वाधिक पाहायला मिळाले. विजेचे खांब कोसळल्यामुळे पुरवठा खंडित झाला. मोबाईल टॉवर पडले. 

जिल्हा प्रशासनाने तात्काळ पंचनामे करायला सुरुवात केली आहे. दापोली तालुक्यातील कजिवली येथील मनोहर चव्हाण यांच्या काजू, आंब्याच्या झाडांचे मोठे नुकसान झाले. हर्णे बंदराजवळील नाडे गावातील सुमारे ८० घरांचे या वादळात नुकसान झाले. पाजपंढरीतील दोन जण जखमी झाले. आगरवायगणी तील वीरेंद्र येलंगे यांच्या बैल, तर आंजर्लेतील राजेश बोरकर यांची गाय मृत झाली. आंजर्लेतील मंगेश महाडिक याच्या सुमारे ४८ कोंबड्या मृत पावल्या. आवाशी येथील ६ घरांचे नुकसान झाले. 

५० हून अधिक गावे बाधित 

जालगाव येथील नरेंद्र बर्वे या बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. सुमारे ५०० पोफळी, २० आंबा कलमे, सहा फणस झाडांचे नुकसान झाले. त्यातील काही झाडे मुळासह उन्मळून पडली. तालुक्यातील सुमारे पन्नासहून अधिक गावे बाधित झाली. या वादळामुळे चिपळूण तालुक्यातील १४ ग्रामीण रस्ते झाडे पडल्यामुळे बंद होते. ते सुरळीत करण्याचे काम सुरु आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. 

 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...