मोसंबीच्या वाण निवडीसाठी संशोधन केंद्रातर्फे बाग सर्वेक्षण 

राज्यातील शेतकऱ्यांना सध्या अस्तित्वात असलेल्या मोसंबी वाणाव्यतिरिक्त भविष्यात इतर वाण देण्याच्या दृष्टीने मोसंबी संशोधन केंद्राने सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे.
Garden survey by research center for selection of citrus varieties
Garden survey by research center for selection of citrus varieties

औरंगाबाद : राज्यातील शेतकऱ्यांना सध्या अस्तित्वात असलेल्या मोसंबी वाणाव्यतिरिक्त भविष्यात इतर वाण देण्याच्या दृष्टीने मोसंबी संशोधन केंद्राने सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. खासकरून जालना व औरंगाबाद जिल्ह्यांतील मोसंबी बेल्टमध्ये हे सर्वेक्षण केले जाणार आहे. 

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यांतर्गत राजेवाडी (ता बदनापूर) येथे सोमवारी (ता. १९) सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले. या वेळी मोसंबी बागायतदार पूनमसिंग काकरवाल, रामेश्‍वर पवार, सुनील पठाडे, सुरेश पवार आदी उपस्थित होते. 

बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्रास वेळोवेळी दिलेल्या भेटीदरम्यान कृषी सचिव एकनाथ डवले, कुलगुरू डॉ. अशोक ढवण, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी नवीन वाणाच्या निवडीबाबत मार्गदर्शनात्मक चर्चा केली होती. त्यानंतर संशोधनाच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. 

राजेवाडी येथील मोसंबी उत्पादकांशी चर्चा करताना डॉ. संजय पाटील म्हणाले, की बदनापूर तालुक्यात २३०० हेक्टर क्षेत्रावर मोसंबी लागवड आहे. राजेवाडी गावात मोठ्या प्रमाणावर लागवड झालेली आहे. एवढ्या मोठ्या झाडांमधून प्रजनन पद्धतीने झाडांची वर्गवारी उत्पन्न, फळांची प्रत, रोग-कीड प्रतिकार क्षमता, झाडाची वाढ, विस्तार, फळांचे वजन, रसाचे प्रमाण आदी बाबी ध्यानात घेऊन अशा निवड केलेल्या झाडांचे डोळे घेऊन केंद्राच्या प्रक्षेत्रावर कलमीकरण करून जुलैमध्ये लागवड करण्याचे नियोजन संशोधन केंद्राने केले आहे. 

तद्‌नंतर सध्या अस्तित्वात असलेल्या वाणासमवेत तुलनात्मक पद्धतीने शास्त्रीय अभ्यास करून निष्कर्ष काढले जाणार आहेत. या संपूर्ण संशोधन प्रकियेस सहा ते सात वर्षांचा कालावधी लागू शकतो. ज्या शेतकऱ्यांच्या बागेमध्ये वैशिष्ट्यपूर्ण गुण असलेले झाड आढळून आल्यास केंद्रास संपर्क करण्याचे आवाहन डॉ. पाटील यांनी केले. 

उपलब्ध वानात उत्पादकता घेण्याचे काम शेतकरी करीत आहेत. संशोधनातून किमान एक वाण उत्पादकांना देण्याचा प्रयत्न असेल. त्यासाठी सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे.  - डाॅ. संजय पाटील,  प्रमुख, मोसंबी संशोधन केंद्र बदनापूर, जि. जालना   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com