Agriculture news in marathi Garlic arrivals in Nashik are normal; The rate is stable | Agrowon

नाशिकमध्ये लसणाची आवक साधारण; दरही स्थिर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील सप्ताहाच्या तुलनेत लसणाची आवक साधारण आहे. दरांत वाढ झाली आहे. आवक १४१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४५०० ते ११००० असा दर मिळाल.

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील सप्ताहाच्या तुलनेत लसणाची आवक साधारण आहे. दरांत वाढ झाली आहे. आवक १४१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४५०० ते ११००० असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

चालू सप्ताहामध्ये कांद्याची आवक ९०८४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १५० ते ६७५ दर मिळाला. बटाट्याची आवक ४५७३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २०५० ते २६०० दर होते. आल्याची आवक ३२६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५५०० ते ८००० दर 
मिळाला. 

सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी, तर काहींची आवक जास्त झाली. त्यामुळे बाजारभाव सुद्धा कमी जास्त निघाले. वालपापडी घेवड्याची आवक ४३०२ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १९०० ते ३००० दर मिळाला. तर, घेवड्याला प्रतिक्विंटल ११०० ते २०००  दर मिळाला. हिरव्या मिरचीची आवक ११२८ क्विंटल झाली. मागणी सर्वसाधारण असल्याने दर स्थिर होते. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल १२०० ते २०००, तर ज्वाला मिरचीला प्रतिक्विंटल १५०० ते २३०० दर मिळाला. भुईमूग शेंगांची आवक ९३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २००० ते ३५०० दर मिळाला. 

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला १७५ ते ४५०, वांगी २२५ ते ४००, फ्लॉवर ५० ते १४० असे प्रति १४ किलोस दर मिळाले. कोबीला ६० ते १२० असा प्रति २० किलोस दर मिळाला. ढोबळी मिरची २०० ते ३५० असा प्रति ९ किलोस दर मिळाला. भोपळा ८० ते २२०, कारले १२० ते ३००, गिलके १०० ते २५०, असे प्रति १२ किलोस दर मिळाले. काकडीला ८० ते ३७५, लिंबू १२० ते २५०, दोडका ३०० ते ७५० असे प्रति २० किलोस दर मिळाले. पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर १२०० ते ११८००, मेथी २००० ते ७५००, शेपू १२०० ते ३०००, कांदा पात २५०० ते ६०००, पालक २५० ते ५२५, तर पुदिन्याला ८० ते १९० असे प्रति १०० जुड्यांना दर मिळाले. 

केळी  ५५० ते ११०० रूपये क्विंटल

फळांमध्ये चालू सप्ताहात डाळिंबांची आवक १२ हजार ८५२ क्विंटल झाली. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ४०० ते ४५०० व मृदुला वाणास प्रतिक्विंटल ४०० ते ७५०० दर मिळाला. केळीची आवक ८५० क्विंटल झाली. तिला ५५० ते ११०० रूपये प्रती क्विंटल मिळाला. पपईची आवक २० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ९०० ते २००० दर मिळाला. ओल्या नारळाची आवक ६०५ क्विंटल झाली. त्यास २५०० ते ३१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मोसंबीची आवक २२० क्विंटल झाली. त्यांना प्रतिक्विंटल १८५० ते ४००० प्रतिक्विंटल दर मिळाला. दशहरी आंब्याची आवक ५० क्विंटल झाली. त्यास २००० ते ५००० प्रतिक्विंटल दर मिळाला.


इतर बाजारभाव बातम्या
नाशिकमध्ये फ्लॉवर १२२१ ते ५३१४ रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
औरंगाबादमध्ये मूग, उडदाची आवक नगण्यऔरंगाबाद: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मूग व...
नगरमध्ये टोमॅटो, शेवग्याचे दर स्थिरनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
कोल्हापुरात कांदा १२० ते ४०० रुपये दहा...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत...
सोलापुरात कांदा, कोथिंबीर, मेथीला उठाव...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये हिरवी मिरची २००० ते ५०००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात सोयाबीन २५०० ते ३९७४ रुपये नगरमध्ये ३००० ते ३७०० रुपये  नगर येथील...
सोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपयेसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची ३७५० ते ६८७५...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळी...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
जळगावात मेथी २००० ते ३५०० रुपये जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...