agriculture news in marathi Garlic in the state costs Rs 5,000 to Rs 13,000 | Agrowon

राज्यात लसूण ५००० ते १३००० रुपये

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.२) लसणाची आवक ४५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ६२०० ते ११५०० रुपये असा दर मिळाला.

नाशिकमध्ये ६२०० ते ११५०० रुपये 

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.२) लसणाची आवक ४५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ६२०० ते ११५०० रुपये असा दर मिळाला. सरासरी दर ९१५० रुपये होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

मंगळवारी (ता.१) लसणाची आवक २८ क्विंटल झाली. त्यास ६१५०  ते १२५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सरासरी दर ९५०० राहिला. सोमवारी (ता.३०) आवक ४८ क्विंटल झाली. त्यावेळी ६५०० ते १२००० रुपये, तर सरासरी दर ९२५० राहिला. शनिवारी (ता.२८) लसणाची आवक ७२ क्विंटल झाली. त्यास ६५०० ते १२१०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सरासरी दर ९२०० रुपये राहिला. शुक्रवारी (ता.२७) लसणाची आवक २५ क्विंटल झाली. त्यास ५३५० ते ११२५० असा दर मिळाला. सरासरी दर ९२०० राहिला. 

गुरुवारी (ता.२६) लसणाची आवक ९३ क्विंटल झाली. त्यास ५२०० ते १०५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ९१०० राहिला. मागील आठवड्यापासून बाजार समितीत लसणाच्या आवकेत घट झाली आहे. त्यामुळे दर स्थिर आहेत. बाजारातील आवकेच्या कमी जास्त प्रमाणामुळे बाजारभावतही चढ-उतार दिसून आला. या आठवड्यात सोमवारी (ता.१)सर्वात जास्त ९५०० रुपये दर मिळाला.

सांगलीत ५५०० ते ९००० रुपये

सांगली  : येथील विष्णू अण्णा पाटील भाजीपाला व फळे बाजारात गुरुवारी (ता. ३)  लसणाची २३० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ५५०० ते ९०००, तर सरासरी ७००० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार समितीत लसणाची आवक कमी अधिक होत आहे. बुधवारी (ता. २) लसणाची १२१ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ५५०० ते १००००, तर सरासरी ७७०० रुपये दर होता. सोमवारी (ता. ३०)१९२ क्विंटल आवक झाली. त्यास ५५०० ते १००००, तर सरासरी ७७०० रुपये दर मिळाला. शनिवारी (ता. २८)  लसणाची २२२ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ५५०० ते १००००, तर सरासरी ७७०० रुपये दर होता.

शुक्रवारी (ता. २७) लसणाची १०० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ५५०० ते १००००, तर सरासरी ७७०० रुपये असा दर होता. गुरुवारी (ता. २६) लसणाची ९० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ५५०० ते १००००, तर सरासरी ७७०० रुपये असा दर मिळाला.

नगरमध्ये ७ ते १३ हजार रुपये 

नगर ः नगर येथील दादा पाटील  शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाला चांगली मागणी आहे. गुरुवारी (ता.३) लसणाची १६ क्विंटलची आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल सात ते १३ हजार व सरासरी १० हजार रुपयांचा दर मिळाला. 

नगर बाजार समितीत दर दिवसाला पंधरा ते २० क्विंटल लसणाची आवक होत असते. कोरोनानंतर बाजार समितीत लसणाला अधिक मागणी वाढली. नगर जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यातूनही लसणाची आवक होत आहे. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून लसणाचा दर टिकून आहे. दीड महिन्यापूर्वी लसणाला प्रतिक्विंटल ८ ते १२ हजार व सरासरी दहा हजार रुपयांचा दर मिळत होता. तोच लसणाचा दर आजही टिकून आहे, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

पुण्यात ५००० ते १०००० रुपये

पुणे  ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.३) लसणाची सुमारे ८ टन आवक झाली. यावेळी दहा किलोला ५०० ते १००० एवढा दर मिळाला. आवक, मागणी आणि दर संतुलित असल्याचे व्यापारी विलास रायकर यांनी सांगितले. लसणाची प्रामुख्याने आवक ही मध्यप्रदेशातून होत आहे.

परभणीत ६००० ते ८५०० रुपये

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.३) लसणाचे दर प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ८५००  रुपये, तर सरासरी प्रतिक्विंटल ७२५० रुपये होते, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

येथील मार्केटमध्ये आठवड्यातील प्रत्येक शनिवारी लसणाची आवक होते. सध्या मध्यप्रदेश, राज्यस्थानमधून ही आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक शनिवारी १८ ते २० क्विंटल आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटल ५५०० ते ८५०० रुपये दर मिळाले. 

गुरुवारी (ता.३) घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ६००० ते ८५०० रुपये होते. तर, किरकोळ विक्री ७० ते १०० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी मो.आवैस यांनी सांगितले

औरंगाबादमध्ये ६००० ते ९००० रुपये

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरूवारी (ता.३) लसणाची १३५ क्‍विंटल आवक झाली. त्यास ६००० ते ९००० रुपये, तर सरासरी ७५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये सामन्यत: गुरूवारी व रविवारी लसणाची आवक होते. मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात लसणाची आवक होते. गत आठवडाभरात २६ व २९ नोव्हेंबरला आवक झाली. २६ नोव्हेंबरला १०९ क्‍विंटल आवक झालेल्या लसणाचे दर ५००० ते ८००० रुपये प्रतिक्‍विंटल होते. सरासरी दर ६५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

२९ नोव्हेंबरला १२० क्‍विंटल आवक झालेल्या लसणाचे दर ४००० ते ८००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. या दिवशी लसणाला सरासरी ६००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

जळगावात ८५०० ते १२५०० रुपये

जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दर शनिवारी लसणाची आवक होते. रोज आवक होत नाही. गेल्या शनिवारी (ता.२८) लसणाची १६ क्विंटल आवक झाली. दर ८५०० ते १३५०० रुपये व सरासरी ११ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल, एवढा मिळाला. 

आवक मध्य प्रदेश, छत्तीसगड या भागातून होत आहे. अडतदार लसूण मागवून घेत आहे. जळगाव बाजार समितीतून इतर भागातील खरेदीदार लसून घेऊन जात आहेत. लसणाची आवक मागील महिनाभरापासून स्थिर आहे. परंतु, दरही स्थिर आहेत. किमान दर आठ हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षा कमी झालेले नाहीत.

मध्य प्रदेशातील इंदूर येथील पुरवठादार लसणाची जळगावच्या बाजारात पाठवणूक करीत आहेत. किरकोळ बाजारात लसणाचे दर किमान १५० रुपये प्रतिकिलोपर्यंत आहेत. सध्या लसणाला उठाव आहे. काही शेतकरी लसणाची लागवड करीत असल्याने त्याची मागणी आहे.

अकोल्यात ५००० ते ८५०० रुपये दर

अकोला : येथील बाजारात लसणाच्या किमतीत गेल्या १५ दिवसांमध्ये घट आली आहे. गुरुवारी (ता.३) येथील बाजारात लसूण किमान ५००० व कमाल ८५०० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटने विक्री झाला. लसणाची किरकोळ विक्री १०० ते १६० रुपयांपर्यंत केली जात आहे.

येथील बाजारात राजस्थान व गुजरातमधून लसणाची दररोज दोन ते तीन ट्रक आवक होत आहे. नवीन हंगाम सुरू होत असल्याने शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला माल मोठ्या प्रमाणात बाहेर काढणे सुरू केले. परिणामी, या पंधरवाड्यात लसणाचे दर बऱ्यापैकी खाली आल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. 

१५ दिवसांपूर्वी लसूण १० हजारांवर पोचलेला होता. तो आता ८५०० पर्यंत खाली आला. आवक वाढली असतानाच बाजारातील मागणी मात्र स्थिर आहे. याचा परिणाम दरांवर झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.


इतर बाजारभाव बातम्या
पुण्यात भाजीपाला आवक घटली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात मका दरात सुधारणाजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
औरंगाबादमध्ये मोसंबीला सर्वसाधारण ३०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कोल्हापूर : गुळाच्या दरात १५० रुपयांनी...कोल्हापूर : बाजार समितीत गेल्या आठ दिवसांमध्ये...
राज्यात बटाटा १००० ते २६०० रुपयेऔरंगाबादमध्ये क्विंटलला १००० ते १२५० रुपये...
नाशिकमध्ये भेंडीला सर्वसाधारण २९१० रुपयेनाशिक : ‘‘येथील बाजार समितीमध्ये भेंडीची आवक ५२...
नाशिकमध्ये कांद्याच्या दरात सुधारणानाशिक: नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नगरमध्ये तूर ४००० ते ५५०० रुपये...नगर ः नगर येथील दादा पाटील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात कांदा दरात सुधारणा सुरूच आहे. दर...
औरंगाबादमध्ये मक्यासह तुरीचे दर स्थिरजालना : येथील बाजार समितीमध्ये गत आठवड्यात ५ ते ९...
पुण्यात भोगीनिमित्त गाजर, मटारला मागणीपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत द्राक्षांना क्विंटलला ६०००...औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ९...
परभणीत शेवग्याला क्विंटलला ५००० ते ८०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
आंबिया संत्र्याला मिळाला २२ हजार...नागपूर : बाजारात संत्र्याचे दर गडगडले असतानाच...
राज्यात कांदा २०० ते ३५०० रुपयेसोलापुरात प्रतिक्विंटला २०० ते ३५०० रुपये...
नाशिकमध्ये दोडक्याची आवक सर्वसाधारण;...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात मक्याची आवक कमीजळगावः खानदेशात प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
जळगावात आले प्रतिक्विंटल ३००० ते ५०००...जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नागपुरात संत्रा, मोसंबीचे दर ‘जैसे थे’नागपूर : मागणीअभावी  संत्रा दरात घसरण झाली...
नगरला वाल, घेवड्याच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...