राज्यात लसूण ४२०० ते २० हजार रूपये प्रतिक्विंटल
राज्यात लसूण ४२०० ते २० हजार रूपये प्रतिक्विंटल

राज्यात लसूण ४२०० ते २० हजार रूपये प्रतिक्विंटल

सांगलीत ४२०० ते १५००० रुपये

सांगली : येथील विष्णुअण्णा पाटील फळ आणि भाजीपाला दुय्यम बाजार आवारात लसणाची आवक कमी-अधिक प्रमाणात होत आहे. गुरुवारी (ता. १४) लसणाची २० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ४२०० ते १५०००, तर सरासरी ९५०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार समितीच्या आवारात लसणाची गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांतून आवक होते. मंगळवारी (ता. ५) २२० क्विंटल आवक झाली होती. त्या वेळी प्रतिक्विंटल ६००० ते १३०००, तर सरासरी ९५०० रुपये असा दर होता. शनिवारी (ता. ९) ८ क्विंटल आवक झाली. दर ४००० ते १५०००, तर सरासरी ९५०० रुपये असा दर मिळाला. मंगळवारी (ता. ११) लसणाची ३३ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ४००० ते १४५००, तर सरासरी ९२५० रुपये असा दर होता.

सोमवारी (ता. १२) हीच आवक १९३ क्विंटल झाली. त्या वेळी ७००० ते १३०००, तर सरासरी १०००० रुपये असा दर होता. गेल्या महिन्यापासून लसणाची आवक आणि दर स्थिर आहेत. पुढील आठवड्यात ही आवक आणि दर स्थिर राहण्याची शक्यता असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

नगरमध्ये १६ ते १८ हजार रुपये 

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाची १६ क्विंटलची आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १६००० ते १८००० रुपये व सरासरी १७००० हजार रुपयांचा दर मिळाला. गेल्या महिनाभराच्या तुलनेत लसणाची आवक आणि दरात सतत चढ-उतार होत आहे.  

नगर बाजार समितीत ३ आक्टोबरला ३० क्विंटल लसणाची आवक झाली. त्या वेळी १२ ते १८ हजार व सरासरी १५००० रुपयांचा दर मिळाला. १० आक्टोबरला १८ क्विंटलची आवक झाली. १० ते १४ हजार व सरासरी १२ हजार रुपयांचा दर मिळाला. १७ आक्टोबर रोजी १५ क्टिंटलची आवक होऊन १४००० ते २०००० व सरासरी १७ हजार रुपयांचा दर मिळाला.

२४ आक्टोबर रोजी १७ क्विटंलची आवक झाली. त्या वेळी १५००० ते २०००० व सरासरी १७५०० रुपयांचा दर मिळाला. ३१ आक्टोबर रोजी १५ क्विटंलची आवक होऊन १०००० ते १५००० रुपये व सरासरी १२५०० रुपयांचा दर मिळाला. ४ नोव्हेंबर रोजी ३८ क्विंटलची आवक झाली. १० हजार ते १४ हजार ४०० व सरासरी १२४०० रुपयांचा दर मिळाला, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

अकोल्यात प्रतिक्विंटलला ७००० ते १४००० रुपये

अकोला : येथील बाजारात लसणच्या दरांमध्ये सुधारणा झाली आहे. उत्कृष्ट दर्जाचा माल १२००० ते १४००० प्रतिक्विंटलने विकला जात आहे. दुय्यम दर्जाच्या मालाला ७००० ते ९००० दरम्यानचा भाव मिळत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

अकोला बाजारपेठेत राजस्थान व मध्य प्रदेशातून दररोज एक ते दोन गाडी मालाची आवक आहे. याद्वारे २० ते २५ टन आवक होत असते. बाजारात लसणाच्या दरात सध्या तेजीचा काळ सुरू आहे. किरकोळ बाजारात लसूण १५० ते २४० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. चांगल्या मालाची मागणी वाढली असल्याने लसणाचा घाऊक दरही वाढला आहे.

नाशिकमध्ये ७००० ते १७००० रुपये

नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १३) लसणाची आवक ३५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७००० ते १७००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १२००० रुपये मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मंगळवारी (ता. १२) लसणाची आवक २३ क्विंटल झाली. त्यास ७५०० ते १७५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १२५०० रुपये मिळाला. सोमवारी (ता. ११) आवक ३८ क्विंटल झाली. त्यास ७००० ते १७५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १३००० रुपये मिळाला. शनिवारी (ता. ९) ४१ क्विंटल आवक झाली. त्या वेळी ७५०० ते १८००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १२५०० रुपये मिळाला.

शुक्रवारी (ता. ८) लसणाची आवक २३ क्विंटल झाली. त्यास ८००० ते १७००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १३००० रुपये होते. गुरुवारी (ता. ७) हीच आवक ७१ क्विंटल झाली. त्या वेळी ७५०० ते १६५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १२५०० रुपये राहिले. मागील आठवड्यापासून बाजार समितीत लसणाची आवक चांगली होती. चालू आठवड्यात आवकेत चढ -उतार दिसून आला. बाजारात होत असलेल्या आवकेच्या कमी जास्त प्रमाणामुळे दरांतही चढ -उतार राहिला. या आठवड्यात शनिवारी (ता. ९) सर्वांत जास्त दर मिळाला.

कोल्हापुरात दहा किलोस १ ते २ हजार रुपये दर

कोल्हापूर : येथील बाजार समितीत लसणाची दररोज ८० ते १०० पोती आवक होत आहे. दहा किलोस १००० ते २००० रुपये इतका दर मिळत आहे. गेल्या पंधरवड्यापासून आवक कमी झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

लसणाचे दर स्थिर आहेत. बाजार समितीत उत्तर भारतातून लसणाची आवक होते. गेल्या सप्ताहात ती अनियमित राहिल्याचे बटाटा विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. गेल्या सप्ताहात पौर्णिमा व अन्य कारणांमुळे दोन दिवस लसणाची आवक झाली नाही. मागणी फारशी नसल्याने दर स्थिर राहिल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.

पुण्यात प्रतिदहा किलोस १००० ते १६०० रुपये

पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १४) लसणाची सुमारे ६० टन आवक झाली. या वेळी दहा किलो लसणाला १ हजार ते १६०० रुपये एवढा दर मिळाला.

 गेल्यावर्षीच्या तुलनेत दरात तेजी असल्याचे प्रमुख आडतदार विलास रायकर यांनी सांगितले. गेल्यावर्षी याच हंगामात दर सुमारे दहा किलोला ५० ते ३५० रुपये होते. लसणाची प्रमुख आवक ही मध्यप्रदेश आणि गुजरात येथून होत आहे. गेल्या आठवड्यात दर हे नियमित असल्याचेही रायकर यांनी सांगितले.

परभणीत प्रतिक्विंटलला १० ते १५ हजार रुपये

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये लसणाचे दर प्रतिक्विंटल १०००० ते १५००० रुपये राहिले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. येथील मार्केटमध्ये आठवड्यातील प्रत्येक शनिवारी लसणाची आवक होत असते. सध्या मध्यप्रदेशातील रतलाम येथून लसणाची आवक होत आहे.

गेल्या महिनाभरातील प्रत्येक शनिवारी १५० ते ४०० क्विंटल लसणाची आवक झाली. महिनाभरात सरासरी ९ हजार ते १५ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. शनिवारी (ता. ९) लसणाची १५० क्विंटल आवक झाली होती. त्या वेळी घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल १०००० ते १५००० रुपये होते. गुरुवारी (ता. १४) लसणाची किरकोळ विक्री प्रतिकिलो १६० ते २०० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी मोहमद आवेस यांनी सांगितले.

सोलापुरात सर्वाधिक १७ हजार रुपये

सोलापूर : सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात लसणाचे भाव पुन्हा उच्चांकी पातळीवर पोचले. लसणाची आवक तुलनेने कमीच राहिली. पण मागणी असल्याने दरांत सुधारणा कायम राहिली. लसणाला प्रतिक्विंटलला सर्वाधिक १७ हजार रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.  

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात लसणाची आवक रोज ७० ते १०० क्विंटलपर्यंत राहिली. स्थानिक भागासह बाहेरील जिल्ह्यातूनही आवक झाली. पण मागणीत असलेले सातत्य आणि आवकेतील तूट यामुळे पुन्हा एकदा लसणाचे दर तेजीत राहिले. या सप्ताहात लसणाला प्रतिक्विंटलला किमान ६५०० रुपये, सरासरी ११ हजार रुपये आणि सर्वाधिक १७ हजार रुपये, असा दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही हाच दर किमान ७ हजार रुपये, सरासरी १० हजार रुपये आणि सर्वाधिक १६ हजार रुपये असा दर होता. आवक ही अशीच १०० ते १२५ क्विंटलपर्यंत होती.

 ऑक्‍टोबरच्या शेवटी आण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातही काहीशी अशीच स्थिती होती. आवक ५० ते ८० क्विंटल आणि दर किमान ७ हजार रुपये, सरासरी १२ हजार रुपये आणि सर्वाधिक १५ हजार रुपये असा होता. केवळ आवक आणि मागणीच्या तफावतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या काळात दराची ही स्थिती अशीच राहील, अशी शक्‍यता बाजार समितीच्या सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली.

जळगावात १२००० ते १७००० रुपये दर

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठवड्यातून एकदाच शनिवारी किंवा बुधवारी   लसणाची आवक होत आहे. आवक मागील तीन ते साडेतीन महिन्यांत नगण्य राहिली आहे. मागील शनिवारी (ता. ९) २०० क्विंटल आवक झाली. दर १२ हजार ते १७ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाले.

किरकोळ बाजारात लसणाची १६० ते २१० रुपये प्रतिकिलो या दरात विक्री होत आहे. लसणाची आवक मध्य प्रदेश, छत्तीसगड या भागांतून होत आहे. पुणे व राज्यातील इतर भागांतून होणारी आवक जवळपास बंदच आहे. लसणाला उठावही चांगला आहे, अशी माहिती मिळाली. 

औरंगाबादमध्ये ६५०० ते १८००० रुपयांचा दर  

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १४) लसणाची ५५ क्‍विंटल आवक झाली. त्याला ६५०० ते १८००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  

औरंगाबाद बाजार समितीमध्ये साधारणत: गुजरात, इंदौर व काही औरंगाबाद जिल्ह्यातून लसणाची आवक होते. ३१ ऑक्‍टोबर रोजी ७२ क्‍विंटल आवक झालेल्या लसणाला ५००० हजार ते १४५०० रुपयांचा दर मिळाला. ७ नोव्हेंबर रोजी ३२ क्‍विंटल आवक झालेल्या लसणाला ७००० ते २४००० रुपयांचा दर मिळाला. आठवड्यातून एक ते दोन वेळा लसणाची आवक होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com