Agriculture news in Marathi, Garvan onion is fast in the Lonand market | Agrowon

लोणंद बाजारात गरवा कांदा दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

लोणंद, जि. सातारा : हळव्या व गरव्या कांद्याच्या आवकेत घट होत असल्याने लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरुवारी झालेल्या कांद्याच्या बाजारात लिलावा दरम्यान हळव्या लाल कांद्याचे भाव प्रतिक्विंटलला ३ हजार ४००, तर गरव्या कांद्याचे भाव ४ हजार ८५१ रुपयांपर्यंत तेजीत निघाले आहेत. 

लोणंद, जि. सातारा : हळव्या व गरव्या कांद्याच्या आवकेत घट होत असल्याने लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरुवारी झालेल्या कांद्याच्या बाजारात लिलावा दरम्यान हळव्या लाल कांद्याचे भाव प्रतिक्विंटलला ३ हजार ४००, तर गरव्या कांद्याचे भाव ४ हजार ८५१ रुपयांपर्यंत तेजीत निघाले आहेत. 

हळव्या व गरव्या कांद्याची केवळ ८०० पिशव्यांची आवक झाली आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती राजेंद्र तांबे व उपसभापती दत्तात्रय बिचुकले यांनी दिली. मार्केट यार्डात सध्या हळव्या लाल कांद्याचा हंगाम सुरू आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे कांदा पिकाला फटका बसला आहे. अति पाण्यामुळे काढलेला कांदा शेतातच नासून नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हाती लागलेला कांदा शेतातून काढून काटून व वाळवून बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. 

बाजारात कांद्याला चांगला भाव असला तरी शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी कांदा नाही, अशी अवस्था आहे. दरवर्षी दिवाळीपूर्वी मार्केटमध्ये हळव्या लाल कांद्याचा हंगाम सुरू होतो. या वर्षी मात्र, अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात सर्वत्र कांद्याच्या मोठ्या प्रमाणावर लागवडी होऊनही पावसाने त्यावर पाणी फिरले आहे. दिवाळी संपूनही कांद्याची तुरळक आवक होत आहे. साठवणुकीच्या गरव्या कांद्याचीही तुरळक आवक होत आहे. त्यामुळे गरव्या कांद्याचे भावही तेजीत निघत आहेत. 

गेल्या आठवड्यात गरवा कांदा प्रतिक्विंटलला पाच हजार रुपयांवर होता, तर आजच्या बाजारातही गरवा कांदा ४ हजार ८५१ रुपयांपर्यंत प्रतिक्विंटलला तेजीत विकला गेला. किरकोळ बाजारातही कांद्याचे भाव चांगलेच कडाडले आहेत. ग्राहकांना ६० ते ७० रुपये प्रतिकिलो दराने किरकोळ विक्री सुरू आहे. दरम्यान, कांदा प्रतवारी करून चांगला वाळवून बाजारात विक्रीसाठी आणण्याचे आवाहनही बाजार समितीचे सचिव विठ्ठल सपकाळ यांनी केले. बाजारात हळव्या व गरव्या कांद्याची मिळून फक्त ८०० पिशव्यांची आवक झाली होती.
 


इतर ताज्या घडामोडी
योग्य पद्धतीने करा बटाटा काढणीयंदा बटाटा पिकाची काढणी फेब्रुवारी- मार्च...
मध्य प्रदेशात द्राक्ष लागवडीसाठी ‘...पुणे : मध्य प्रदेशातील बागायतदार शेतकरी आता...
खरबूज लागवड तंत्रज्ञानखरबूज पिकाची लागवड जानेवारी ते मार्च यादरम्यान...
नांदर्खे, खोंडमळीत आधार प्रमाणीकरण,...नंदुरबार  ः महात्मा फुले कर्जमुक्ती...
जळगाव  : आधार प्रमाणीकरण करण्यासाठी...जळगाव  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कांदा दरांवरील दबाव वाढलाजळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
गडहिंग्लजमध्ये यंदा अधिक पाणीसाठागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : गतवर्षीच्या ऑगस्ट...
यवतमाळ जिल्हा बॅंकेकरिता तब्बल ३००...यवतमाळ  ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या...
मोसंबीला खतमात्रा देणे अत्यंत आवश्‍यक...औरंगाबाद : ‘‘मोसंबी पीक हे शेतकऱ्यांची...
उच्च तंत्रज्ञानावर आधारित फुलशेती...नाशिक : मालेगाव तालुक्यातील वडेल येथील कृषी...
नांदेड विभागात साखरेचे २५ लाख क्विंटलवर...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीत १.२६...नांदेड : नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीमध्ये...
नाशिक : माथाडींच्या संपामुळे बाजार...नाशिक  : राज्यातील माथाडी कामगारांच्या...
‘भीमा’च्या कामगारांचे पैसे पाच...मोहोळ, जि. सोलापूर : कामगारांच्या खात्यावर ५...
सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरून भाजप...मुंबई ः स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव...
करमाळ्यात शुद्ध; पंढरपुरात सर्वांत...सोलापूर : जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे ६१५...
शिवस्मारक निविदेत गैरव्यवहार नाही;...मुंबई ः मुंबईजवळच्या अरबी समुद्रात उभारण्यात...
तूर खरेदीसाठी हमी देण्याबाबत मंत्रिमंडळ...मुंबई ः ‘‘राज्यात सध्या ३१७ तूर खरेदी केंद्रे...
पुणे जिल्ह्यात भाजीपाला पिकांकडे...पुणे ः गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पोषक...
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी २६ मार्चला...मुंबई ः राज्यसभेच्या ५५ जागांसाठी येत्या २६ मार्च...