नागपूरात गाठी व्यावसायिकांना दोन कोटींचा फटका 

सलग दोन वर्षे होळी सणाच्या दरम्यान लॉकडाउन घोषित करण्यात आल्याने गाठी व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
gathi industry
gathi industry

नागपूर : सलग दोन वर्षे होळी सणाच्या दरम्यान लॉकडाउन घोषित करण्यात आल्याने गाठी व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दोन्ही वर्षी भांडवल म्हणून लावलेले पैसे निघू न शकल्याने प्रत्येक व्यावसायिक तोटा सहन करतो आहे. यामुळे शहरातील सुमारे दोन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून, अनेकांनी कारखानेदेखील बंद केले आहेत. 

गाठ्या तयार करण्यासाठी शहरातील विविध भागांमध्ये वसलेले अनेक कारखाने दरवर्षी दोन महिन्यांपूर्वीपासूनच तयारीला लागतात. शहरात असे पन्नास कारखाने असून, त्यावर व्यावसायिकांसह सुमारे २५० कामगारांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र मागील वर्षी लॉकडाउन दरम्यान गाठी विकत घेणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांनी मालच विकत घेतला नाही. त्यामुळे जवळपास एक कोटी रुपयांचा फटका या व्यवसायाला बसला. 

या धक्क्यातून सावरत सकारात्मक उद्देश ठेवत या वर्षी सर्व व्यावसायिकांनी जोमाने सुरुवात करीत गाठींची निर्मिती केली. परंतु १५ मार्च रोजी पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने व्यवसायाची वाटचाल या वर्षी देखील तोट्याच्या दिशेने वळली. यापूर्वी १ हजार किलोचा माल विकत घेणारा किरकोळ व्यापारी यंदा फक्त ५० किलोंचा माल विकत घेतो आहे. तसेच लहान-लहान गावांतून येणारे किरकोळ व्यापारी यंदा माल घेऊ शकले नाहीत. तोटा सहन न झाल्याने शहरातील कारखानदारांनी कारखाने बंद केले आहेत. 

प्रतिक्रिया आम्ही अनेक पिढ्यांपासून या व्यवसायात आहे. लॉकडाउनमुळे आम्हाला मागील वर्षी दोन लाखांचा फटका बसला. शहरामध्ये जवळपास ५० कारखाने असून, प्रत्येक कारखान्यामध्ये ५ जण कामाला आहे. या सर्व २५० कामगारांवर संकट ओढवले आहे.  -लक्ष्मीनारायण शाहू, गाठी कारखानदार  गाठीचे दर  घाऊक बाजार : ६० ते ६२ रुपये किलो.  किरकोळ बाजार : ८० ते १०० रुपये किलो.  कारखाने : ५०  तोटा : ४ लाख रुपये (प्रत्येकी दोन वर्षे)  एकूण तोटा : २ कोटी रुपये  एकूण खप  पोते (दरवर्षी) : २ हजार ते २ हजार ५००  लॉकडाउनमध्ये : ५०० पोती   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com