जळगावात गवार १८०० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटल

जळगावात गवार १८०० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटल
जळगावात गवार १८०० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटल

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ११) गवारीची अडीच क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १८०० ते ३८०० रुपये मिळाला. आवक भुसावळ, यावल, जळगाव, जामनेर आदी भागांतून होत आहे. दर महिनाभरापासून स्थिर आहेत.  बाजारात आल्याची २१ क्विंटल आवक झाली. आल्यास प्रतिक्विंटल २००० ते ४८०० रुपये दर मिळाला. भरताच्या वांग्याची २४ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ९०० ते १४०० रुपये असा मिळाला. हिरव्या मिरचीची २८ क्विंटल आवक झाली. मिरचीला प्रतिक्विंटल १२०० ते १९०० रुपये दर मिळाला. बिटची १०  क्विंटल आवक झाली. बिटाला प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाला. लिंबाची पाच क्विंटल आवक झाली, त्यास प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर होता. शेवग्याची दीड क्विंटल आवक झाली. शेवगा शेंगांना प्रतिक्विंटल १२०० ते १६०० रुपये दर मिळाला.  बटाट्याची २५० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर होता. डाळिंबाची १८ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २००० ते ४८०० रुपये दर मिळाला.  पालकची दोन क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १२०० रुपये मिळाला. गाजराची आठ क्विंटल आवक झाली, त्यास प्रतिक्विंटल ९०० ते १४०० रुपये दर मिळाला. कोबीची २० क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल ८०० ते १४०० रुपये मिळाला. काटेरी, लहान वांग्यांची २५ क्विंटल आवक झाली.   प्रतिक्विंटल ८०० ते १४०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची नऊ क्विंटल आवक झाली. १०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मेथीची आठ क्विंटल आवक झाली. मेथीस प्रतिक्विंटल ११०० ते १८०० रुपये दर होता. भेंडीची १७ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १५०० ते २२०० रुपये मिळाला. टोमॅटोची २१ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ९०० ते १६०० रुपये मिळाला.  ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com