कीडनाशकाच्या बाटलीसोबत आता गॉगल आणि मास्क

गेल्या वर्षी फवारणीदरम्यान विषबाधेचे प्रकार घडले होते. या घटनांमध्ये बाधितांपैकी काही जणांचा मृत्यूही झाला. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्याकरिता या वर्षीच्या हंगामात कीडनाशक विक्रेत्यांना गॉगल आणि मास्क देणे अनिवार्य करण्यात आले आहे. - विजय कुमार, मुख्य सचिव (कृषी)
फवारणी
फवारणी

नागपूर ः राज्यात या पुढे कोणतेही कीडनाशक विक्री करताना त्यासोबत मास्क आणि गॉगल देणे विक्रेत्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यात यापूर्वी फवारणीदरम्यान घडलेल्या विषबाधांवर नियंत्रणासाठी हा पर्याय अवलंबिण्यात आल्याची माहिती कृषी खात्याच्या विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.  गेल्या वर्षीच्या हंगामात बोंडअळीच्या नियंत्रणाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा होण्याचे प्रकार घडले होते. याची सर्वाधिक झळ यवतमाळ जिल्ह्यात बसली. तब्बल १९ जणांना या घटनेत आपला जीव गमवावा लागला. या सर्वांना सुरवातीला दोन लाख व त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर अतिरिक्‍त दोन लाख याप्रमाणे चार लाख रुपयांची मदत देण्यात आली. राज्यात फवारणी दरम्यान, झालेल्या विषबाधेमुळे दगावणाऱ्यांची संख्या ४८ वर पोचली होती. त्याची दखल घेत या वर्षी फवारणीदरम्यान होणाऱ्या विषबाधांच्या घटनांवर नियंत्रणाचे प्रयत्न कृषी विभागाकडून केले जात आहेत.  त्याच प्रयत्नाअंतर्गंत या वर्षी किडनाशकासोबत मास्क आणि गॉगल देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. कीटकनाशक विक्रेत्यांना कीडनाशकाची खरेदी करणाऱ्यांना हे सुरक्षाविषयक साहित्य द्यावे लागेल, तसे आदेश देण्यात आले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com