सरपंचासह सदस्यांना विमामसंरक्षण द्या

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गाव पातळीवर ग्रामपंचायतींमार्फत जंतूनाशक फवारणीसह अन्य उपाययोजना केल्या जात आहे.
corona
corona

नगर ः कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गाव पातळीवर ग्रामपंचायतींमार्फत जंतूनाशक फवारणीसह अन्य उपाययोजना केल्या जात आहे. कोरोनाशी लढताना अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह ग्रामपंचायत कर्मचारी जीवावर उदार होऊन काम करत आहेत. त्यामुळे सरकारने ग्रामपंचायत अंतर्गत काम करणाऱ्यांना प्रत्येकी पन्नास लाखाचे विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी सरपंच परिषदेचे राज्याध्यक्ष दत्ता काकडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली आहे.  राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे, उपाध्यक्ष अनिल गीते, सरचिटणीस विकास जाधव, महिला प्रदेशाध्यक्ष राणी पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी केली आहे.  कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका वाढत आहे. शहरासोबत आता ग्रामीण भागातही रुग्ण आढळत आहेत. लॉकडाऊन केल्याने शहरातील मोठ्या प्रमाणात लोक गावांत आले आहेत. गाव पातळीवर कोरोनाबाबत उपाययोजना करण्याची जबाबदारी सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचारी पार पाडत आहेत. सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यासह नव्याने गावांत आलेल्या लोकांचा सर्वे करताना अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच ग्रामपंचायतीचे लोकही जीव धोक्यात घालून काम करत आहेत. दुर्दैवाने काही घटना घडली तर ग्रामपंचायतीमधील लोकांना गंभीर समस्येला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे सरकारने ग्रामपंचायत अंतर्गत काम करणाऱ्यांना प्रत्येकी पन्नास लाखाचे विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. 

दरम्यान, सरपंच परिषदेकडून वंचित चारशे कुटूंबांना भाजीपाल्याचे मोफत वाटप करण्यात आले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com