agriculture news in Marathi, gave warning to banks who not giving loan to sugar factories, Maharashtra | Agrowon

साखर कारखान्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांना समज द्या
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 19 जुलै 2019

मुंबई: आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना वित्तपुरवठा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांना राज्य शासनाने कडक शब्दात समज द्यावी, असा ठराव ऊस दर नियंत्रण मंडळाच्या बैठकीत झाला. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. १७) ही बैठक झाली. या बैठकीला जलसंधारणमंत्री तानाजी सावंत, सहकार विभागाच्या सचिव आभा शुक्ला, कृषीचे प्रधान सचिव एकनाथ डवले उपस्थित होते. 

मुंबई: आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना वित्तपुरवठा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांना राज्य शासनाने कडक शब्दात समज द्यावी, असा ठराव ऊस दर नियंत्रण मंडळाच्या बैठकीत झाला. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. १७) ही बैठक झाली. या बैठकीला जलसंधारणमंत्री तानाजी सावंत, सहकार विभागाच्या सचिव आभा शुक्ला, कृषीचे प्रधान सचिव एकनाथ डवले उपस्थित होते. 

तीन टप्प्यात वाहतूक खर्च करावा, या निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि कारखाने देत असलेल्या रेकॉर्डची माहितीची सत्यता तपासण्यासाठी शासकीय यंत्रणा उभी करावी, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींचा समावेश असावा, अशी सूचना बैठकीत करण्यात आली. गूळ कारखाने तसेच खांडसरी गूळ पावडरनिर्मितीसाठी गाळप केलेल्या उसालाही एफआरपीच्या कक्षेत आणावे, अशी सूचना काही सदस्यांनी केली. 

बैठकीला शिवानंद दरेकर, पांडुरंग थोरात, भानुदास शिंदे, महेमूद पटेल, कारखाना प्रतिनिधी धर्मराज काडादी, श्री. शेटे आदी उपस्थित होते.

बैठकीतील सूचना...

  • कामगारांची ने-आण करणे, त्यांच्या राहण्याची व्यवस्था, बैलगाडी देखभाल व दुरुस्ती, स्लिप बॉय मदतनीस यांचे वेतन आदी खर्च तोडणी-वाहतूक खर्चात न पकडता व्यवस्थापन खर्चात समाविष्ट करावा. आरएसएफची थकीत बाकी ठेवणाऱ्या कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करावी, अशी मागणी प्रल्हाद इंगोले यांनी केली. 
  • कारखान्यांकडून होत असलेली काटामारी रोखण्यासाठी सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासावेत, अशी मागणी विठ्ठल पवार यांनी केली
  • अनेक वर्षे उत्पादन देईल अशा उसाच्या नव्या जातींचे संशोधन करावे, अशी सूचना पांडुरंग शिंदे यांनी केली. 
  • आरआरसी कारवाईच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना कालमर्यादा ठरवून द्यावी, ऊस तोडणी यंत्रधारकांच्या थकीत अनुदानाचा प्रश्न शासनाने लवकर निकाली काढावा अशी विनंती करण्यात आली.

इतर अॅग्रो विशेष
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
भाजीपाल्याचे आगार उद्ध्वस्तकोल्हापूर/सांगली : ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण...
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...
कृत्रिम पावसासाठी अखेर विमान उडाले; ३८...औरंगाबाद  : कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी...
पुरामुळे मका पिकाला फटकानवी दिल्ली  ः महाराष्ट्र आणि कर्नाटकात मका...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे : कमाल तापमानात वाढ होत असतानाच, बुधवारी (ता...
मंदीचा मारगेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीचे चटके देशाला बसत...
समस्यांच्या गर्तेत हरवलेली शेतीकाही वर्षांपूर्वी उत्तम शेती असण्याची अनेक कारणे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
मार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...