गावरान बोरांचा दर्जा घटला; आवक वाढली

Gavran ber quality declined; Incoming increased
Gavran ber quality declined; Incoming increased

पुणे ः सातत्याने बदलणारे हवामान, ढगाळ वातावरण आणि थंडीची कमतरता यामुळे गावरान बोरे झाडावरच परिपक्व होऊ लागली आहेत. यामुळे बोरांचा दर्जा खालावला असून, आवक वाढली आहे. परिणामी दर तुलनेने कमी असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. गावरान आंबट गोड बोरांना सध्या २० ते ३० रुपये प्रति किलो दर मिळत आहे. 

याबाबत बोलताना नगर जिल्ह्यातील औरंगपूर (ता. पाथर्डी) येथील कमलाकर देशमुख म्हणाले, ‘‘माझी पारंपरिक ७० बोरांची झाडे आहेत. तुळशीच्या लग्नानंतर बोरांच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. आठवड्याला साधारण तीन वेळा १५-२० क्रेट (३०० ते ४०० किलो) मी पुणे बाजार समितीमध्ये बोरे घेऊन येतो. सध्या थंडी कमी असून, सततच्या ढगाळ वातावरणामुळे बोरे लवकर परिपक्व होऊन खाली पडत आहेत. त्यामुळे बोरांचा दर्जा घसरला असून, बाजारात दर मिळत नाही. गेल्यावर्षी हाच दर ५० रुपयांपर्यंत होता. मात्र यंदा बोरे लवकरत परिपक्व होत असल्याने हंगाम देखील लवकर संपणार आहे. बोरांचा हंगाम साधारण मार्च अखेर पर्यंत चालतो. मात्र, यंदा संक्रांतीनंतर संपेल असे वाटते. यंदा उत्पादन चांगले असले तरी मालाचा दर्जा नसल्याने दर कमी मिळत आहे.’’

बोरांच्या विविध जाती बाजारात उपलब्ध असल्याने ग्राहक दुसरी बोरे खरेदी करत असल्याचे निरीक्षणही देशमुख यांनी नोंदविले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com