अकोट बाजार समिती सभापतिपदी गावंडे, तर उपसभापतिपदी राजकुमार मंगळे

अकोट बाजार समिती सभापतिपदी गावंडे, तर उपसभापतिपदी राजकुमार मंगळे
अकोट बाजार समिती सभापतिपदी गावंडे, तर उपसभापतिपदी राजकुमार मंगळे

अकोला  ः जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सोमवारी (ता. ९) झालेल्या निवडणुकीत सभापतिपदी भारती गजानन गावंडे तर उपसभापती म्हणून राजकुमार मंगळे यांची बिनविरोध निवड झाली. येथे जिल्हा उपनिबंधक कार्यालयात ही निवड प्रक्रिया पार पडली. सभापती, उपसभापतिपदासाठी दोनच अर्ज आले होते.  अकोट बाजार समितीची निवडणूक न्यायालयाच्या शर्ती व अटीला अधीन राहून जिल्हा उपनिबंधकांनी जाहीर केली. सभापतिपदासाठी भारतीताई गावंडे, प्रा. अतुल म्हैसने तर उपसभापतिपदासाठी राजकुमार मंगळे, डॉ. गजानन महल्ले यांचे अर्ज दाखल झाले होते. परंतु डॉ. महल्ले व प्रा. म्हैसने यांनी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणुक बिनविरोध झाली. याबाबत अंतिम शिक्कामोर्तब मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ करणार आहे. ते संचालक राहिले गैरहजर  अकोट बाजार समितीचे चार संचालक अपात्र ठरविण्यात आले आहेत. मात्र, निर्देशानुसार त्यांना या प्रक्रियेत सहभागी करण्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे या चार संचालकांची मते वेगळ्या पेटीत ठेवण्याची व्यवस्था केली होती. मात्र ते चौघेही गैरहजर राहिले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com