Agriculture news in marathi; Gawande, Akot Bazar Committee Chairman Rajkumar Mangale as Vice-President | Agrowon

अकोट बाजार समिती सभापतिपदी गावंडे, तर उपसभापतिपदी राजकुमार मंगळे

टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

अकोला  ः जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सोमवारी (ता. ९) झालेल्या निवडणुकीत सभापतिपदी भारती गजानन गावंडे तर उपसभापती म्हणून राजकुमार मंगळे यांची बिनविरोध निवड झाली. येथे जिल्हा उपनिबंधक कार्यालयात ही निवड प्रक्रिया पार पडली. सभापती, उपसभापतिपदासाठी दोनच अर्ज आले होते. 

अकोला  ः जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सोमवारी (ता. ९) झालेल्या निवडणुकीत सभापतिपदी भारती गजानन गावंडे तर उपसभापती म्हणून राजकुमार मंगळे यांची बिनविरोध निवड झाली. येथे जिल्हा उपनिबंधक कार्यालयात ही निवड प्रक्रिया पार पडली. सभापती, उपसभापतिपदासाठी दोनच अर्ज आले होते. 

अकोट बाजार समितीची निवडणूक न्यायालयाच्या शर्ती व अटीला अधीन राहून जिल्हा उपनिबंधकांनी जाहीर केली. सभापतिपदासाठी भारतीताई गावंडे, प्रा. अतुल म्हैसने तर उपसभापतिपदासाठी राजकुमार मंगळे, डॉ. गजानन महल्ले यांचे अर्ज दाखल झाले होते. परंतु डॉ. महल्ले व प्रा. म्हैसने यांनी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणुक बिनविरोध झाली. याबाबत अंतिम शिक्कामोर्तब मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ करणार आहे.

ते संचालक राहिले गैरहजर 
अकोट बाजार समितीचे चार संचालक अपात्र ठरविण्यात आले आहेत. मात्र, निर्देशानुसार त्यांना या प्रक्रियेत सहभागी करण्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे या चार संचालकांची मते वेगळ्या पेटीत ठेवण्याची व्यवस्था केली होती. मात्र ते चौघेही गैरहजर राहिले. 


इतर ताज्या घडामोडी
ठिबक सिंचनातील पंप निवडीसाठी तांत्रिक...महाराष्ट्रामध्ये शेतकरी कापूस, हळद, ऊस, संत्रा,...
वारणा, गोकुळ दूध संघांकडून दरात वाढकोल्हापूर : जिल्हा दूध संघ (गोकुळ) आणि वारणानगर...
नाशिक : अतिवृष्टीनंतर कपाशीवर करपाचा...नाशिक : अतिवृष्टीमुळे सातत्याने कपाशी लागवडीमध्ये...
कृषी संशोधन केंद्रे पांढरा हत्ती ठरू...भंडारा ः सर्वाधिक रोजगार शेतीमधून उपलब्ध होऊ शकतो...
मधमाश्या, मित्रकीटक वाचविण्यासाठी...नाशिक: मधमाश्यांची संख्या जगभरात तसेच भारतातही...
बाधितांसाठी मागितले दहा कोटी अन्‌...आटपाडी, जि. सांगली ः अवकाळी पावसामुळे आटपाडी...
शेतकरी संघटनेचे गुरुवारी निर्बंधमुक्ती...नगर ः संपूर्ण कर्जमाफी करून राज्यातील शेतकऱ्यांचा...
पुणे : फळपीक विमा योजना असून नसल्यासारखीपुणे : फळपिकांना हवामानाच्या धोक्यापासून संरक्षण...
गडहिंग्लजमध्ये ज्वारीचे क्षेत्र एक हजार...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : अतिवृष्टी आणि अवकाळी...
बाजारपेठेवर आधारित पीकपद्धतीचा अवलंब...नगर  : ‘‘कमी पाणी व जास्त पाणी, अशा दोन...
नवीन वर्षात ७५० ग्रामपंचायतींच्या...पुणे : येत्या नवीन वर्षात जुलै ते डिसेंबर २०२० या...
हिंगोली जिल्ह्यात रब्बीची ७६ हजार...हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात सोमवार...
पुण्यात पालेभाज्यांसह कांद्याच्या आवकेत...पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
गहू, हरभरा पिकांसाठी एकात्मिक...या वर्षी परतीच्या पावसाचे प्रमाण अधिक राहिल्याने...
शेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा...नाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या...
कृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यचपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त...
कडधान्यवर्गीय बियाणे उत्पादकांना अनुदान...अकोला  ः कडधान्यवर्गीय पिकांच्या पायाभूत...
अमरावती ‘एसआयटी’कडूनही अजित पवार निर्दोषमुंबई : नागपूर विभागातील सिंचन घोटाळ्यापाठोपाठ...
नांदेड जिल्ह्यात कृषी योजनेंतर्गत १...नांदेड : जिल्हा परिषदेच्या कृषी...
पुणे विभागात गळीत हंगामात १८ साखर...पुणे : गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना होत...