औरंगाबादेत गवार १५०० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटल

औरंगाबादेत गवार १५०० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटल
औरंगाबादेत गवार १५०० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटल

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ८) गवारची ४७ क्‍विंटल आवक झाली. तिला १५०० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी १७२ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला १००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ५७९ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला ४०० ते १४५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. वांग्याची आवक १८ क्‍विंटल, तर दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ४९  क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीला ६०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

हिरव्या मिरचीची आवक १२० क्‍विंटल, तर दर ४००० ते ५००० रुपये, काकडीची आवक २२ क्‍विंटल, तर दर ८०० ते १००० रुपये, लिंबाची आवक ३५ क्‍विंटल, तर दर १००० ते ३२०० रुपये, कारल्याची ३३ क्‍विंटल आवक, तर दर १५०० ते २५०० रुपये,  दुधी भोपळ्याची आवक १४ क्‍विंटल, तर दर ५०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटल मिळाले.

५७ क्‍विंटल आवक झालेल्या पत्ताकोबीला १००० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. फ्लाॅवरची आवक ८५ क्‍विंटल झाली. त्यास १००० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २९ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीचे दर १००० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. शेवग्याची आवक ४१ क्‍विंटल, तर दर १००० ते ३००० रुपये,  कैरीची ८७ क्‍विंटल आवक, तर दर १५०० ते २००० रुपये, दिलपसंदची १६ क्‍विंटल आवक, तर दर ६०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. भुईमूग शेंगाची आवक ४८ क्‍विंटल, तर दर ३२०० ते  ३७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

मेथीच्या ३ हजार जुड्याची आवक झाली. तिला ५०० ते १२०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. ७ हजार जुड्यांची आवक झालेल्या पालकचे दर ६०० ते ७०० रुपये प्रतिशेकडा राहिले. १३ हजार ५००  जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीला ५०० ते ९०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. ५ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाचे दर ५०० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

१३० क्‍विंटल आवक झालेल्या आंब्याला १२०० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. टरबुजाची आवक १४० क्‍विंटल झाली. त्यास ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २५ क्‍विंटल आवक झालेल्या खरबूजचे दर १३०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com