Agriculture News in Marathi Geo-tagging of Shindi trees now The Nira sale process will be online | Page 2 ||| Agrowon

शिंदीच्या झाडांचे आता जिओ टॅगिंग  नीरा विक्री प्रक्रिया ऑनलाइन होणार 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 नोव्हेंबर 2021

राज्य शासनाने नीरा देणाऱ्या शिंदीच्या झाडांचे आता जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. आता नीरा विक्रीची परवाना प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार आहे. 
 

नागपूर ः राज्य शासनाने नीरा देणाऱ्या शिंदीच्या झाडांचे आता जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. आता नीरा विक्रीची परवाना प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार आहे. 

नीरा लागवड, उत्पादन आणि विक्रीचे सर्वंकष धोरण ठरवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारसींनुसार प्रचलित पद्धती आणि नियमांतील बदलांचे सुधारित धोरण शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात आले. नव्या धोरणात नीरेतील भेसळ ओळखण्यासाठी साहित्य (किट) उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच नीरा विक्रीच्या दरावर असलेले शासनाचे नियंत्रण रद्द करण्यात आले आहे. त्या बाबतची शासन अधिसूचना यथावकाश प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पारदर्शी आणि लोकाभिमुख प्रशासनाच्या अनुषंगाने तंत्रज्ञानाचा फायदा होण्यासाठी नीरा विक्री

परवान्यांकरिता संगणकीय प्रणाली विकसित केली जाईल. अर्ज केल्यापासून कोणत्याही परिस्थितीत एक महिन्याच्या कालमर्यादेत नीरा उत्पादन, सीलबंद करणे, विक्री, नीरेपासून गूळ आणि अन्य पदार्थ तयार करण्यासाठीचा परवाना संबंधित प्राधिकाऱ्यांनी मंजूर किंवा नामंजूर करावा. अन्यथा सदर परवाना मंजूर केल्याचे अर्जदाराला गृहीत धरता येईल. नीरा देणाऱ्या झाडांचे जिओ टॅगिंग करण्याचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. झाडे छेदणे, नीरेची वाहतूक, दुकानातून विक्री यासाठीची संगणकीय प्रणाली विकसित करावी. या संगणकीय प्रणालीमुळे नीरेचे उत्पादन, वाहतूक आणि विक्री या साखळीवर, भेसळीवर नियंत्रण ठेवणे उत्पादन शुल्क विभागाला शक्य होईल. शिंदीच्या झाडाला रात्री मडके अडकवून त्याला कोयत्याने खापे मारतात. त्यातून थेंबा थेंबाने गोड रस पाझरतो. त्या गोड रसास नीरा म्हणतात.


इतर बातम्या
धुळे जिल्ह्यात पारा २.८ अंशांवरपुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र...
खतांची चढ्या दराने विक्री नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत....
खांडसरी, गूळ उद्योगावर येणार कायद्याचा...पुणे ः राज्यातील गूळ उद्योगावर कायदेशीर नियंत्रण...
‘पोकरा’मधील घोटाळ्याचा अहवाल दडपलापुणे ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (...
खाद्यतेल आत्मनिर्भरतेची घोषणाचपुणे ः देशात खाद्यतेलाची जवळपास ६० टक्के गरज...
प्रसिद्ध लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट...पुणे ः प्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट...
सोलापुरात कांद्याची दहा हजार टन आवकसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कांदा बीजोत्पादन संकटातखामखेडा, जि. नाशिक : चालू वर्षीच्या सततच्या...
सरकारने कापसाला दहा हजार रुपये हमीभाव...नागपूर : भारतीय बाजारपेठेत कापसाचे दर १० हजार...
केसर आंबा निर्यातीस मोठी संधी ः डॉ....औरंगाबाद : ‘‘या वर्षी देशांतून आंबा निर्यात खुली...
वाशीम जिल्ह्यात सिंचन व्यवस्था निर्माण...वाशीम ः जिल्ह्यात ग्रामीण भागाच्या विकासासाठी,...
‘जालना पाटबंधारे’कडून भूसंपादनाची...औरंगाबाद : भूसंपादनाची कार्यवाही जालना पाटबंधारे...
कृषी योजनांत नगर राज्यात आघाडीवरनगर ः ‘‘कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ...
आंबेगावच्या ४०० श्रमिकांची ‘ई-श्रम...पुणे : केंद्र सरकारच्या, श्रम व रोजगार...
कनेरगावात ६५ एकरांवर मॉडर्न मार्केट...हिंगोली ः ‘‘जिल्ह्यातील वसमत येथील राष्ट्रीय...
वीजबिल थकबाकीवरून महाविकास आघाडीत कुरबूरमुंबई :  राज्यातील विविध पाणीपुरवठा संस्था...
औरंगाबाद जिल्ह्याची विकासकामांत घोडदौड...औरंगाबाद : ‘‘औरंगाबाद जिल्ह्याची विविध...
पुणे जिल्ह्यातील पशुधनाला मिळणार...पुणे ः ‘‘जिल्ह्याच्या ग्रामिण आणि दुर्गम भागातील...
सातारा जिल्हा बँकेचे कामकाज नेत्रदीपक...सातारा : ‘‘शेतीपूरक व्यवसायात व कर्जपुरवठ्यात...
परभणी जिल्ह्यात ‘रोहयो’ची १ हजार ७२०...परभणी ः जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...